AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार! नेमकं काय झालं?

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक झाली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर हार्दिक पांड्याने 8, तर सूर्यकुमार यादवने दोन सामन्यात कर्णधारपद भूषवलं. असं असताना एक बातमी समोर आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार! नेमकं काय झालं?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पुन्हा कर्णधार बदलणार, नेमकं काय झालं?Image Credit source: BCCI/IPL
| Updated on: May 06, 2026 | 8:46 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. प्लेऑफमध्ये जागा मिळवायची असेल तर प्रत्येक सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. नेट रनरेटचं गणित सुटलं आणि 14 गुणांवर सगळं येऊन ठेपलं, तर मुंबई इंडियन्सला संधी मिळू शकते. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी मुंबईचा संघ रायपूरला रवाना झाला आहे. पण हार्दिक पांड्या मुंबईतच असल्याने वेगवेगळ्या बातम्यांना पेव फुटलं होतं. सूर्यकुमार यादवचं आरसीबीविरूद्धच्या सामन्यात कर्णधारपद भूषवेल असं सांगितलं जात आहे. पण आता नवी बातमी समोर आहे. आरसीबीविरूद्धचा सामना हार्दिक पांड्या खेळणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडची धुरा पुन्हा एकदा हार्दिक पांड्याकडे येणार आहे. रविवारी आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी हार्दिक पांड्या फिट अँड फाईन होईल असं सांगण्यात आहे.

हार्दिक पांड्या रायपूरला संघासोबत न गेल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पण मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू अजूनही मुंबईत आहे. त्यांच्यासोबत हार्दिक पांड्या रायपूरला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिक पांड्या पाठिच्या दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. त्या दुखापतीतून हार्दिक पांड्या सावरला आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या करो या मरो या सामन्यात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा धुरा सांभाळताना दिसणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर मुंबईचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे चार पैकी चारही सामने जिंकणं भाग आहे.

हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म

हार्दिक पांड्या सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकही चांगली कामगिरी केली नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीत फेल गेला आहे. त्याने आतापर्यंत 8 सामने खेळले आणि 208 च्या सरासरीने 146 धावा केल्या. खरं तर त्याला खोऱ्याने धावा करण्याची संधी होती. पण फेल गेला. त्यानंतर गोलंदाजीतही पदरी निराशा पडली आहे. त्याने 8 सामन्यात फक्त 4 विकेट घेतल्या. त्यात इकोनॉमी रेट हा 11.9 प्रति षटक आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधारपदाचा कस लागला आहे.

Follow Us
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात