AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच युजवेंद्र चहलकडून मोठा खुलासा, म्हणतोय ‘या’ संघाकडून खेळाचंय

भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आयपीएलमध्ये सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) संघाकडून खेळतो.

IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच युजवेंद्र चहलकडून मोठा खुलासा, म्हणतोय 'या' संघाकडून खेळाचंय
yuzvendra chahal
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 1:05 PM
Share

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने युएईत घेणार असल्याचे नुकतेच बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले. त्यानंतर सर्वत्र आयपीएलचीच चर्चा सुरु आहे. फिरकीपटू युजवेंद्र चहलला देखील एका मुलाखतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) व्यतीरिक्त कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल? असे विचारले असता त्याने धोनीच्या चेन्नई सुपरकिंग संघाचे (CSK) नाव घेतले. (Yuzvendra Chahal Wants to Play From Chennai Super Kings in IPL)

सध्या सर्व भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून आधी WTC Final आणि त्यानंतर इंग्लंडसोबत कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील संघात चहलला सामिल करण्यात आले नसल्याने तो सध्या घरीच आराम करत आहे. यावेळी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून क्रिकट्रॅकर या वेबसाइटला त्याने नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची मजेशीर उत्तर दिली. ज्यात त्याला आवडता कर्णधार, आवडते फिरण्याचे ठिकाण असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.

View this post on Instagram

A post shared by CricTracker (@crictracker)

मुंबई इंडियन्स संघातून पदार्पण

मुलाखतीत चहलला आरसीबी शिवाय कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल, असे विचारण्यात आले. त्यावेळी थोडी वाट पाहून त्याने चेन्नई सुपरकिंग्स संघाचे नाव घेतले. चहलने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केले होते. त्यानंतर आरसीबीने त्याला विकत घेतले आणि तो आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू झाला. त्यामुळे मागील बरेच सीजन तो आरसीबीकडूनच खेळत आहे.

मुलाखतीत चहलला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे –

# करियरमधील बेस्ट मूमेंट?

-2016 साली भारतीय संघात केलेले पदार्पण

# विराट कोहली आणि एमएस धोनीमध्ये उत्तम कर्णधार?

-दोघेही

# चहलचा बॉलीवूड गाण्यांवरील डान्स कि एबी डिव्हिलीयर्सच कन्नड भाषांमधील गाणं गाणे, काय जास्त मनोरंजनात्मक आहे?

-डिव्हिलियर्सचे गाणे

# विराट कोहलीसाठी तीन शब्द?

-अनुशासित, मेहनती आणि जोशिला.

# तुझ्या जीवनावर चित्रपट बनला तर तुझा आणि पत्नी धनश्रीचा रोल कोणी करावा?

-रणदीप हुड्डा आणि कतरीना कैफ

# ख्रिस गेल आणि तुमच्यात पंजा लढवण्यात कोण जिंकेल?

-मी

# आरसीबी नाही तर कोणत्या आयपीएल संघाकडून खेळू इच्छितोस?

-चेन्नई सुपर किंग्स

# बुद्धीबळ खेळणाऱ्या कोणत्या खेळाडूसोबत सामना खेळू इच्छितोस?

-विश्वनाथन आनंद

# कोणत्या माजी फलंदाजाला बॉलिंग करायचीये?

-ब्रायन लारा

# भारताशिवाय कोणती क्रिकेट टीम भारी आहे?

-न्यूझीलंड

# कोणत्या बॉलीवुड अॅक्ट्रेसवर क्रश आहे?

-कतरीना कैफ

# रोहित शर्मा की रितिका सजदेह कोणासोबत सोशल मीडियावर लाईव्ह करताना मजा येते?

-रितिका सजदेह

# सगळ्यात विचित्र गोष्ट कोणती खाल्ली आहेस?

-लॉबस्टर (समुद्री झिंगा)

# ग्लेन मॅक्सवेलला नेट्समध्ये कितीदा आऊट केले आहेस?

-तीन-चार वेळा

# कोणत्या गोष्टीमुळे धनश्री सर्वाधिक वैतागते?

-पब्जी खेळण्याने

# ‘ई साला कप नमदे’ शिवाय कोणता कानडी शब्द आठवतो?

-येली इदिरा (तु कुठे आहेस)

# एमएस धोनीने दिलेली बेस्ट Advice?

-स्वत:वर विश्वास ठेव आणि प्रत्येक गोष्टीत एकाग्रता बाळग.

# अगर तु हॅशटॅग असतास तर काय असतास?

-कॉमेडियन

# आवडते फिरण्याचे ठिकाण?

-ग्रीस

# कोणता असा रेकॉर्ड आहे जो बनवू इच्छितोस?

-कसोटी सामन्यातील एका डावांत पाच विकेट

हे ही वाचा :

IPL 2021 : आयपीएलचं ठिकाण ठरलं, उर्वरीत सामने होणारच, BCCI चा मोठा निर्णय

IPL रंगणार खरी पण विदेशी खेळाडूंचे धक्के सुरुच, आता बांगलादेशच्या या दोन खेळाडूंचा उर्वरित सामन्यांना रामराम!

IPL 2021 पूर्वीच दिग्गज क्रिकेटर्सचा टी-20 धमाका, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी

(Yuzvendra Chahal Wants to Play From Chennai Super Kings in IPL)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.