AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : आरसीबीला प्लेऑफआधी मोठा झटका, मॅचविनर 18 व्या मोसमातून आऊट, कुणाला संधी?

Royal Challengers Bengaluru IPL 2025 : प्लेऑफमध्ये पोहचलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मोठा झटका लागला आहे. आरसीबीचा मॅचविनर गोलंदाज प्लेऑफसाठी उपलब्ध नसणार. तो गोलंदाज नक्की कोण आहे? जाणून घ्या

IPL 2025 : आरसीबीला प्लेऑफआधी मोठा झटका, मॅचविनर 18 व्या मोसमातून आऊट, कुणाला संधी?
Virat Kohli Royal Challengers Bengaluru Ipl 2025Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: May 19, 2025 | 3:35 PM
Share

गुजरात टायटन्सने रविवारी 18 मे रोजी दिल्ली कॅपिट्ल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. दिल्लीने विजयासाठी दिलेलं 200 धावांचं आव्हान गुजरातच्या शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीनेच पूर्ण केलं. गुजरातने 19 ओव्हरमध्ये 205 रन्स केल्या. गुजरातचा हा नववा विजय ठरला. गुजरातने यासह प्लेऑफमधील स्थान निश्चित केलं. तसेच गुजरातच्या या विजयामुळे आरसीबी आणि पंजाब किंग्सनेही प्लेऑफमध्ये धडक दिली. मात्र आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचताच वाईट बातमी मिळाली आहे. आरसीबीचा मॅचविनर खेळाडू उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.त्यामुळे आरसीबी टीम मॅनेजमेंटने बदली खेळाडूची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी आयपीएल 2025 मध्ये आरसीबीकडून खेळतोय. जून महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामना होणार आहे. या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना 26 मे पर्यंत मायदेशी बोलावलं आहे. त्यामुळे लुंगीला आरसीबीसोबत शेवटपर्यंत थांबता येणार नाही. त्यामुळे आरसीबीने लुंगीच्या जागी झिंबाब्वेचा उंचपुरा गोलंदाज ब्लेसिंग मुझरबानी याला संधी दिली आहे. आरसीबीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

लुंगी 23 मे रोजी त्याचा आयपीएल 2025 मधील शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात आरसीबी विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. त्यांनतर लुंगी मायदेशी रवाना होईल. तर आरसीबीच्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात आणि प्लेऑफमध्ये मुझरबानी याला संधी मिळू शकते.

ब्लेसिंग मुझरबानी याची उंची 6 फुट 8 इंच इतकी आहे. झिंबाब्वेच्या या 28 वर्षीय गोलंदाजाने आतापर्यंत 70 टी 20, 55 एकदिवसीय आणि 12 कसोटी सामने खेळले आहेत. ब्लेसिंगने कसोटीत 51, वनडेत 69 आणि टी 20I मध्ये 78 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्लेसिंग मुझरबानी याचा आरसीबीत समावेश

आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये कुठे?

दरम्यान आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत.आरसीबीने त्यापैकी 8 सामने जिंकले आहेत. आरसीबीला 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. तर एक सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आरसीबीच्या खात्यात 17 गुण आहेत. आरसीबीचा नेट रनरेट हा +0.482 असा आहे. तसेच आरसीबी 23 मेनंतर 27 तारखेला साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना खेळणार आहे. आरसीबी या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध भिडणार आहे.

Follow Us
अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या....
Gokul : अमूलमध्ये जे घडलं, तेच गोकुळमध्ये घडणार? गुजरात हायकोर्टाच्या जुन्या निकालाची पुन्हा चर्चा
मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स.....
Mohammed Shami Retirement : मोहम्मद शमीचा कसोटी क्रिकेटला अलविदा; 64 सामने, 229 विकेट्स, 13 वर्षांचा प्रवास संपला
गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर...
Gokul Milk Union : गोकुळसाठी काढलेल्या अध्यादेशावर अखेर राज्यपालांची मोहोर; राज्यपालांच्या निर्णयाने सत्तेचं गणित बदलणार?
ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद
Thane ATS : ठाण्यातून 10 लाखांचं बक्षीस असलेला फरार नक्षलवादी जेरबंद; महाराष्ट्र ATS ची मोठी कारवाई
मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
Murasu Cyclone Andhra Pradesh : मुरासू चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशाला मोठा फटका; 1919 कोटींचं नुकसान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; कोर्टाने थेट....
हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
Saamana On BJP : हा रडीचा डाव जनता उधळून लावेल; सामनातून सरकारवर हल्लाबोल
10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरण....
NCP  : 10 तारखेनंतर शरद पवारांसोबत पुन्हा बैठक; राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार?
गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा...
Satej Patil On Gokul : गोकुळ तुमची जहागीर नाही...; सरकारी हस्तक्षेपावरून सतेज पाटलांचा सरकारला थेट इशारा
सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या....
Gokul Milk Union : सहकारी संस्थांवर सरकारचा मोठा निर्णय; 500 कोटींच्या उलाढालीच्या संस्थांवर...