पाकिस्तान Air Force मध्ये ट्रेनिंग, आता IPL मध्ये धमाका करण्यासाठी उत्सुक

पाकिस्तान Air Force मध्ये ट्रेनिंग घेणारा हा खेळाडू पाकिस्तानचा नाही. मग कोण आहे तो?

पाकिस्तान Air Force मध्ये ट्रेनिंग, आता IPL मध्ये धमाका करण्यासाठी उत्सुक
cricketer
Image Credit source: instagram/AFP
| Updated on: Dec 09, 2022 | 1:29 PM

मुंबई: IPL मध्ये खेळणं प्रत्येक खेळाडूच स्वप्न असतं. जगातील मोठ्या क्रिकेट लीगमध्ये प्रत्येक खेळाडू आपली क्षमता प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक असतो. झिम्बाब्वे ऑलराऊंडर सिकंदर रजाच सुद्धा हेच स्वप्न आहे. अलीकडेच संपलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सिकंदर रजाने जबरदस्त प्रदर्शन केलं. आयपीएलमध्ये खेळणं आपल्यासाठी सन्मानाची बाब असेल, असं हा खेळाडू म्हणाला. मला आयपीएल टुर्नामेंट खूप आवडते. असं सिकंदर रजा म्हणाला.

डोळ्यांच्या समस्येमुळे स्वप्न पूर्ण झालं नाही

सिकंदर रजा आता भले झिम्बाब्वेकडून खेळतो. पण तो सुरुवातीच क्रिकेट पाकिस्तानमध्ये खेळलाय. सिकंदर रजाचा जन्म सियालकोटमध्ये झाला. त्याला पायलट बनण्याची इच्छा होती. पण डोळ्यांच्या समस्येमुळे तो आपलं स्वप्न पूर्ण करु शकला नाही.

पाकिस्तानी एअरफोर्समध्ये ट्रेनिंग

सिकंदर रजाने पाकिस्तानी एअरफोर्समध्ये साडेतीन वर्ष प्रशिक्षण घेतलय. एक चांगला क्रिकेटर आणि चांगली व्यक्ती घडवण्यात या ट्रेनिंगचा फायदा झाला. या ट्रेनिंगमुळे त्याच्या अंगात शिस्त भिनली. याचाच परिणाम त्याच्या क्रिकेट खेळण्यामध्येही दिसतो.

T20 वर्ल्ड कपमध्ये काय परफॉर्मन्स आहे?

सिकंदर रजा आयपीएल 2023 मध्ये मोठी रक्कम मिळू शकते. त्याची बेस प्राइस 50 लाख रुपये आहे. चेन्नई, मुंबई सारख्या टीम त्याच्यावर बोली लावू शकतात. सिकंदर रजाने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये 27.37 च्या सरासरीने 219 धावा केल्या. त्याशिवाय त्याने 10 विकेटही घेतल्या. सिंकदरच्या या ऑलराऊंडर परफॉर्मन्समुळे त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळू शकते.