AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED Raid On Anil Ambani : 3,716 कोटीचं घर जप्त, त्यानंतर आता..अनिल अंबानी यांना ईडीचा मोठा दणका

ED Raid On Anil Ambani : प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना आज पुन्हा एकदा ईडीने झटका दिला आहे. अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्या या ईडीच्या रडारवर आहेत.

ED Raid On Anil Ambani : 3,716 कोटीचं घर जप्त, त्यानंतर आता..अनिल अंबानी यांना ईडीचा मोठा दणका
Anil Ambani
| Updated on: Mar 06, 2026 | 10:28 AM
Share

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांना आज पुन्हा एकदा ईडीने झटका दिला. अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्यांवर ईडीकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. 10 ते 12 ठिकाणी ईडीकडून ही छापेमारीची कारवाई सुरु आहे. ईडीच्या 15 टीम्स या कारवाईमध्ये सहभागी झाल्या आहेत. रिलायन्स पावर लिमिटेडवर ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येतय. बँक घोटाळा प्रकरणात अनिल अंबानी यांच्याविरोधात ईडीकडून ही कारवाई सुरु आहे. बँकेकडून कर्ज घेताना अनियिमितता झाल्याचं हे प्रकरण आहे. अनिल अंबानी यांचं मुंबईतील घर ईडीने जप्त केलं आहे. त्याशिवाय अनिल अंबानी स्वत: अनेकवेळा ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले आहेत.

याआधी ईडीकडून त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार ईडीकडून या प्रकरणात तात्पुरत्या स्वरुपात जप्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मागच्या महिन्यात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अनिल अंबानी यांच्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण 15000 कोटींपेक्षा जास्तची जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

चौकशीचा ससेमिरा

यापूर्वी अनिल अंबानी यांची ऑगस्ट 2025 मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी पीएमएलए अंतर्गत त्यांचा जबाव नोंदवण्यात आला होता. मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स, रिलायन्स होम फायनान्स या कंपन्यांतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार या संस्थांच्या 8 हजार 997 कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली होती. अनिल अंबानी यांच्या समूहातील कंपन्यांमागे अनेक दिवसांपासून चौकशीचा ससेमिरा लागला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...