Icc T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी आणखी एक संघाची घोषणा, ऑलराउंडरकडे नेतृत्व, कुणाचा समावेश? जाणून घ्या

Icc T20I World Cup 2026 Zimbabwe Sqaud : शुक्रवारी 2 जानेवारी रोजी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी एकूण 2 संघ जाहीर करण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेनंतर आता झिंबाब्वेने आयसीसीच्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.

Icc T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी आणखी एक संघाची घोषणा, ऑलराउंडरकडे नेतृत्व, कुणाचा समावेश? जाणून घ्या
India vs Zimbabwe Sanju Samson
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 02, 2026 | 10:59 PM

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी शुक्रवारी 3 जानेवारीला उपविजेता राहिलेल्या दक्षिण आफ्रिकेने संघ जाहीर केला. त्यानंतर काही तासांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी झिंबांब्वे संघाची घोषणा करण्यात आली आहे. झिंबाब्वे क्रिकेट बोर्डाने 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. निवड समितीने ऑलराउंडर सिकंदर रझा याला कर्णधारपदाची सुत्र दिली आहेत. रझाने गेल्या काही मालिकांमध्ये सातत्याने कर्णधार म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. तसेच रझाने बॅटिंग आणि बॉलिंगनेही योगदान दिलंय. झिंबाब्वे 2024 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पात्र ठरली नव्हती. मात्र यंदा झिंबाब्वेने पात्रता फेरीतून वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं आहे. त्यामुळे रझा याने महत्त्वाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

झिंबाब्वेला लिंबुटिंबु टीम समजलं जातं. मात्र झिंबाब्वेने गेल्या काही वर्षात या प्रतिमेला छेद दिला आहे. झिंबाब्वेने अनेक उलटफेर केले आहेत. झिंबाब्वेच्या निवड समितीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात अनुभवी खेळाडूंना स्थान दिलं आहे. ब्रायन बेनेट, ब्लेसिंग मुजरबानी आणि रिचर्ड नगारवा यांचा समावेश आहे. ब्रायनने अनेक सामन्यात बॅटिंगने निर्णायक भूमिका बजावली आहे. त्यामुळे ब्रायनवर या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे. तसेच ब्लेसिंग मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा हे झिंबाब्वेचे प्रमुख गोलंदाज आहेत. त्यामुळे या दोघांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

ब्रँडन टेलर हा झिंबाब्वेचा अनुभवी फलंदाज आहे. ब्रँडनने अनेकदा झिंबाब्वेला एकहाती क्रिकेट सामने जिंकून दिलेत. त्यामुळे ब्रँडनकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. ब्रँडनने झिंबाब्वेचं 58 टी 20i सामन्यांत प्रतिनिधित्व केलं आहे. ब्रँडनने या 58 टी 20i सामन्यांमध्ये 1 शतक आणि 6 अर्धशतकांसह 1 हजार 185 धावा केल्या आहेत. आता ब्रँडनच्या या अनुभवाचा झिंबाब्वेला किती फायदा होतो? हे येत्या स्पर्धेतच स्पष्ट होईल.

झिंबाब्वेसमोर कुणाचं आव्हान?

दरम्यान झिंबाब्वेचा या स्पर्धेसाठी बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे. या बी ग्रुपमध्ये झिंबाब्वेला ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळायचा आहे.

वर्ल्ड कपसाठी झिंबाब्वे टीम

टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी झिंबाब्वे टीम : सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रीम क्रेमर, ब्रॅडली इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तादिवानाशे मारुमणी, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुझाराबानी, डायन मायर्स, रिचर्ड नगारावा आणि ब्रेंडन टेलर.