AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये खेळाडूंची भीषण स्थिती, मजुरांसारखी कमाई, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वे मध्ये उद्या गुरुवारपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या मालिकेआधी झिम्बाब्वे मध्ये क्रिकेटची स्थिती काय आहे? ते तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे.

IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये खेळाडूंची भीषण स्थिती, मजुरांसारखी कमाई, वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
zimbabwe sportsImage Credit source: twitter
| Updated on: Aug 17, 2022 | 10:42 AM
Share

मुंबई: भारत आणि झिम्बाब्वे मध्ये उद्या गुरुवारपासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या मालिकेआधी झिम्बाब्वे मध्ये क्रिकेटची स्थिती काय आहे? ते तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. झिम्बाब्वे मध्ये खेळ आणि खेळाडू दोघांची स्थिती खराब आहे. तिथे खेळाडूंच रोजच आयुष्य संघर्षमय आहे. बोर्डाकडून मदत दूरची गोष्ट राहिली, खेळाडूंना आपल्या रोजच्या गरजा पूर्ण करणही जमत नाहीय. झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू गरीबी मध्ये जीवन जगत आहेत. फक्त क्रिकेटच नाही, तिथे खेळल्या जाणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये खेळाडूंची अशीच स्थिती आहे. कोरोनामुळे झिम्बाब्वे मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल बंद करण्यात आलं. अजून पर्यंत हा निर्णय कायम आहे. त्याचा परिणाम तिथल्या खेळाडूंवर दिसून येतो. त्यामुळे त्या खेळाडूंनी मनी गेम कडे मोर्चा वळवला आहे. जेणेकरुन रोजच्या गरजा पूर्ण करता येतील. मनी गेम म्हणजे फुटबॉल सामन्यामधून मिळणारे उत्पन्न. क्लबकडून खेळण्यासाठी खेळाडूंना पैसे मिळतात.

खेळाडूची एका महिन्याची कमाई 1100 रुपये

Aljazeera च्या एका रिपोर्ट्नुसार क्लबसाठी फुटबॉल खेळणाऱ्या एका खेळाडूला महिन्याला सरासरी झिम्बाब्वे मध्ये 5000 डॉलर मिळतात. इतके डॉलर म्हणजे तुम्हाला खूप मोठी रक्कम वाटेल, पण असं नाहीय. भारतीय रुपयांमध्ये त्याच मुल्य फक्त 1100 रुपये आहे. म्हणजे मजुरांसारखी झिम्बाब्वेच्या फुटबॉलपटूंची स्थिती आहे. कारण मजुरांना महिन्याला अशा प्रकारचं वेतन मिळतं.

खेळाडूंकडे पर्याय नाही

झिम्बाब्वे मध्ये मनी गेम मध्ये सहभागी होणं बेकायद आहे. सरकारी नियमांच्या विरुद्ध आहे. पण झिम्बाब्वे मध्ये आंतरराष्ट्रीय सामने बंद आहेत. त्यामुळे खेळाडूंकडे दुसरा पर्याय उरलेला नाही. झिम्बाब्वेची राजधानी हरारे शहरात होणाऱ्या अशा फुटबॉल सामन्यांना स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

अनेक वर्षांपासून सुरु आहे मनी गेम

झिम्बाब्वे मध्ये मनी गेम अनेक वर्षांपासून खेळला जात आहे. देशात फुटबॉलचा ऑफ सीजन असताना मनी गेम खेळला जातो. आता यात देशातील काही हाय प्रोफाइल फुटबॉलपटू दिसू लागले आहेत. कोरोनामुळे त्यांनी तिथे मोर्चा वळवलाय. रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना हा निर्णय घ्यावा लागलाय.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....