23 वर्षीय क्रिकेटपटूला बलात्कारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

लंडन : कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा, ऑस्ट्रेलियात जन्मलेला क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्नला (Alex Hepburn) बलात्कार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कौंटी क्रिकेटमधील वोर्सेस्टशायरचा माजी खेळाडू हेपबर्नने 2017 मध्ये हे कृत्य केलं होतं. मित्रांसोबत एका व्हॉट्सअप गेममध्ये अधिक स्कोअर करण्याच्या प्रयत्नात हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे. अॅलेक्स हेपबर्नला शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी त्याला गुन्ह्याची तीव्रता जाणवून …

23 वर्षीय क्रिकेटपटूला बलात्कारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा

लंडन : कौंटी क्रिकेटमध्ये खेळणारा, ऑस्ट्रेलियात जन्मलेला क्रिकेटपटू अॅलेक्स हेपबर्नला (Alex Hepburn) बलात्कार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कौंटी क्रिकेटमधील वोर्सेस्टशायरचा माजी खेळाडू हेपबर्नने 2017 मध्ये हे कृत्य केलं होतं. मित्रांसोबत एका व्हॉट्सअप गेममध्ये अधिक स्कोअर करण्याच्या प्रयत्नात हे कृत्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

अॅलेक्स हेपबर्नला शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी त्याला गुन्ह्याची तीव्रता जाणवून दिली. महिलेला अपमानित करुन तिच्यासोबत क्रूरकृत्य करणं एक गंभीर अपराध आहे, त्याची जाणीव आता तुला होईल, असं न्यायाधीश म्हणाले.

अॅलेक्स हेपबर्नला न्यायालयाने 13 एप्रिलला दोषी ठरवलं होतं. एका झोपलेल्या महिलेसोबत जबरदस्ती करत, अॅलेक्सने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

कोण आहे अॅलेक्स हेपबर्न?

23 वर्षीय अॅलेक्स हेपबर्न हा कौंटी क्रिकेटमध्ये वोर्सेस्टशायर संघाकडून खेळत होता. मात्र त्याच्यावर गंभीर आरोप लागल्याने संघाने त्याची हकालपट्टी केली.

अॅलेक्स हेपबर्नने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2 सामन्यात 32 धावा केल्या आहेत. त्याने या सामन्यांमध्ये 6 विकेट्सही आपल्या नावे केल्या.

5 टी 20 सामन्यात 25 धावा त्याच्या नावावर असून, 6 विकेट्सही त्याने घेतल्या.

अॅलेक्स हेपबर्नने 2015 मध्ये वोर्सेस्टशायरकडून टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2017 मध्ये तो अखेरचा सामना खेळला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *