
पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने दावा केला आहे की तो त्याचा सहकारी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमपेक्षा चांगला दिसत आहे, कारण त्याने स्वत: ला ‘परफेक्ट पॅकेज’ असल्याचे म्हटले. यासंदर्भातलं वृत्त ‘डेली मेल’ या वेबसाईटने दिले आहे. ‘पियर्स मॉर्गन अनसेन्सॉर्ड’या टॉक शोवर त्याने स्वत: ला ‘परफेक्ट पॅकेज’ असल्याचे नेमके का म्हटले, प्रश्न काय विचारण्यात आला होता? याविषयी पुढे वाचा.
दरम्यान, रोनाल्डोच्या ‘परफेक्ट पॅकेज’ स्टेटमेंटची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. अर्थातच रोनाल्डोची तंदुरुस्त आणि देखणी शरीरयष्टी अनेकांना भुरळ घालतेच. पण, त्याने हे ‘परफेक्ट पॅकेज’चं स्टेटमेंट केलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पर्सनॅलिटीविषयी चर्चा होऊ लागली.
तुम्हाला माहिती आहे की, रोनाल्डो आणि डेव्हिड बेकहॅम हे दोघेही त्यांच्या करिअरमध्ये समान मार्गांने गेले. दोघेही रिअल माद्रिदमध्ये सामील होण्यापूर्वी मॅन युनायटेडमध्ये काम करत होते. बेकहॅम आणि रोनाल्डो या दोघांनीही फुटबॉलच्या पलीकडे जाऊन जगभरातील आयकॉन बनले आहेत, फॅशनच्या जगात प्रवेश केला आहे आणि त्यांच्या लूकसाठी देखील लक्ष वेधले गेले, ते कायम चर्चेत असतात.
बेकहॅमच्या लूकवर काय म्हणाला रोनाल्डो ?
रोनाल्डो बेकहॅमपेक्षा चांगला दिसतो की नाही, हा प्रश्न ‘पियर्स मॉर्गन अनसेन्सॉर्ड’या टॉक शोवर विचारण्यात आला होता. पियर्स मॉर्गन यावेळी म्हणाले की, बेकहॅम एक खेळाडू म्हणून रोनाल्डोच्या ‘समान लीगमध्ये नाही’, परंतु रोनाल्डोला प्रश्न विचारण्यात आला की, ‘तो स्वत: ला उत्कृष्ट दिसतो का?’ पुडे मॉर्गन यांनी विचारले की, ‘तुमची तुलना बेकहॅमशी केली जाते, कमीतकमी तुमचे लुक, तुम्हाला असे वाटते की तुम्ही डेव्हिड बेकहॅमपेक्षा चांगले दिसता?.’
त्यावर ख्रिस्तियानो रोनाल्डो याने पियर्स मॉर्गन यांना थेट उत्तर दिलं, ज्याची सध्या चर्चा सुरू आहे. ‘ तो ( रोनाल्डो) डेव्हिड बेकहॅमपेक्षा चांगला दिसतो’ असं त्याने थेट सांगितलं. पुढे रोनाल्डो म्हणाला की, बेकहॅमचा चेहरा सुंदर आहे परंतु माझ्याकडे ‘परफेक्ट पॅकेज’ आहे. ‘माझ्यासाठी [चांगलं] दिसणं म्हणजे केवळ चेहराच नव्हे तर संपूर्ण पॅकेज आहे.’ अशी टिप्पणी त्याने केली.
‘तुम्ही दहा मिनिटांसाठी कोपाकबाना ओलांडत आहात. सर्वात जास्त कोणाकडे लक्ष दिले जाते?’, मॉर्गनने विचारले. यावर रोनाल्डो म्हणाला, ‘मी, 100 टक्के,’ रोनाल्डोने उत्तर देताच मॉर्गनने हशा पिकला. ‘मला हे माहित होते, मी फक्त तुझ्याकडून चिडवण्याचा प्रयत्न करीत होतो,’ मॉर्गन पुढे म्हणाला.
रोनाल्डोने इंग्लंडच्या फुटबॉलच्या महान खेळाडूबद्दल आपले मत मांडण्यापूर्वी या जोडीने हलक्या फुलक्या टिप्पणीला हशा पिकला. ‘तो चांगला दिसत आहे,’ रोनाल्डो म्हणाला. ‘मला तो आवडतो, तो चांगला बोलणारा माणूस आहे.’