AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : CSKची पराभवाची हॅटट्रिक, रडकुंडीला आलेल्या कॅप्टन गायकवाडने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?

Ruturaj Gaikwad Statement : आयपीएल 2026 मधील चेन्नईच्या सलग तिसऱ्या पराभवामुळे कॅप्टन ऋतुराज गायकवाड प्रचंड संतापला आहे. काल आरसीबीविरुद्धच्या सामन्यात सीएसकेला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. सलग तिसऱ्यांदा संघ हरल्यामुळे कॅप्टन निराश असून त्याने या पराभवाबद्दल ज्या व्यक्तीला जबाबदार ठरवलं ती म्हणजे...

IPL 2026 : CSKची पराभवाची हॅटट्रिक, रडकुंडीला आलेल्या कॅप्टन गायकवाडने कोणावर फोडलं पराभवाचं खापर ?
चेन्नईच्या पराभवासाठी कोण जबाबदार ?Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 06, 2026 | 8:10 AM
Share

IPL 2026 ची सुरूवात होऊन आठवडा उलूटन गेला तर एकेकाळी बराच दबदबा असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) संघाला काही सूर गवसलेला नाही. या मोसमासत चेन्नईचा लागोपाठ पराभव होत असून तकाल आरसीबी विरुद्धचा सामना हरल्यानंतर त्यांची पराभवाची हॅटट्रिक झाली. आरसीबीविरुद्ध सीएसकेची आघाडीची फळी सपशेल नाकाम ठरली आणि संघाला पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली. सीएसकेच्या या निराशाजनक कामगिरीमुळे संघाचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड हा मात्र प्रचंड संतापला आहे. काल पराबवाची हॅटट्रिक झाल्यावर कॅप्टन गायकवाडच्या रागाच उद्रेक झाला. त्यानंतर त्याने या पराभवाला जबाबदार असलेल्या व्यक्तीचं नाव स्पष्टपणे घेत खापर त्याच्यावर फोडलं,

विशेष म्हणजे कालच्या आरसीबीविरुद्धच्या पराभवाबद्दल ऋतुराज गायकवाडने स्वत:च जबाबदारी घेतली. मी जर आणखी धावा केल्या असत्या, तर मॅचचा निकाल काही वेगळा लागला असता, पण मी तसं करून शकलो नाही, असं म्हणत त्याने स्वत:च्याच खेळीची चिरफाड करत अपयशाची जबाबदारी स्वीकारली. आरसीबीच्या टीममधील टिम डेविड (नाबाद 70), देवदत्त पडीक्कल (50 रन) यांच्या शानदार खेळीनंतर संघातील गोलंदाजांनीही उत्तम कामगिरी करत सीएकेला 43 धावांनी हरवत सलग दुसरा विजय मिळवला.

काय म्हणाला ऋतुराज गायकवाड ?

“खरं सांगायचं तर, संघाच्या कामगिरीने मला थोडं आश्चर्य वाटलं. सरफराज खान, प्रशांत वीर आणि जेमी ओव्हरटन यांनी उत्तम खेळी करून दाखवली. मला वाटतं, जर मी डावाच्या सुरुवातीला धावा केल्या असत्या, तर आम्ही लक्ष्य गाठू शकलो असतो. त्यामुळे, आजच्या पराभवाची जबाबदारी मी घेतो. विराट कोहलीने क्षेत्ररक्षणात सोडलेला झेल आणि टीम डेव्हिडच्या आक्रमक फलंदाजीने सामन्याचे चित्रच पालटले. 14 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात टीकून होतो, पण त्यानंतर झालेल्या चुकांमुळे सामना हातातून निसटला” असं पराभवानंतर ऋतुराज गायकवाड म्हणाला.

कालच्या सामन्यात कॅप्टन ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि आरसीबीचा संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. डेव्हिड आणि पडिक्कल यांच्या नाबाद 48 धावा, कर्णधार रजत पाटीदारच्या नाबाद 48 धावा आणि फिल सॉल्टच्या 46 धावांच्या जोरावर आरसीबीने तीन विकेट्स गमावून 250 धावांचा डोंगर उभा केला. पडिक्कल (29 चेंडू, पाच चौकार, दोन षटकार) आणि डेव्हिड (25 चेंडू, तीन चौकार, आठ षटकार) यांनी स्फोटक फटकेबाजी करत सीएसकेच्या गोलंदाजांना चोपून काढलं. कर्णधार पाटीदारने 19 चेंडूंच्या खेळीत एक चौकार आणि सहा षटकार ठोकत 48 धावा केल्या. तर सॉल्टने आपल्या 30 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार मारले.

सीएसकेची खेळी

मात्र त्यांना प्रत्युत्र देताना, आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या घसरणीतून सावरण्यात सीएसकेचा संघ अपयशी ठरला. सरफराज खानने 50 धावा करूनही, 19.4 षटकांत संघ अवघ्या 207 धावांवर ऑलआऊट झाला. सरफराज व्यतिरिक्त, प्रशांत वीरने 43 आणि जेमी ओव्हरटनने 37 धावा केल्या. आरसीबीसाठी भुवनेश्वर कुमार सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 4 षटकांत 41 धावा देऊन तीन विकेट्स टिपल्या. जेकब डफी, कृणाल पांड्या आणि अभिनंदन सिंग यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. सुयश शर्माने 1 बळी घेतला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...