VIDEO : ‘मेरे देश की धरती’ गाण्यावर भारतीय संघाचा डान्स

VIDEO : 'मेरे देश की धरती' गाण्यावर भारतीय संघाचा डान्स

सिडनी : कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाने 72 वर्षानी एक नवा इतिहास रचला आहे. भारतीय संघाने सोमवारी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर ऐतिहासिक विजय मिळवत नवीन वर्षाची सुरुवात केली. या ऐतिहासिक विजयाचं सेलिब्रेशन विराट आणि त्याच्या टीमने अत्यंत रोमहर्षक पद्धतीने केले.

बीसीसीआयने ट्विटर हँडलवरुन विराट आणि टीमच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात विराट आणि त्याची टीम ‘मेरे देश की धरती’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. तसेच, आणखी एक व्हिडीओ असून, त्यात भारतीय संघ आपल्या चाहत्यांसोबत डान्स करताना दिसत आहेत.

व्हिडीओमध्ये सर्वात आधी हार्दिक पांड्या आणि नंतर कर्णधार विराट कोहली डान्स करत आहे. यानंतर पूर्ण भारतीय संघ भांगडा करताना दिसत आहे.


हा व्हिडीओ मैदानातून ड्रेसिंग रुमपर्यंत जात असतानाचा आहे. यावेळी भारतीय संघाचा चाहता ग्रुप ‘भारत आर्मी’ने गेटवर उभे राहून भारतीय संघाचे स्वागत केले. ढोल-ताशांसह भारतीय संघाच्या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. ड्रेसिंग रुममध्ये जोरदार धमाल मस्ती करण्यात आली. ऋषभ पंत नागीन डान्स करताना दिसला तर विराट कोहली भांगडा करताना दिसत आहे.


विशेष म्हणजे, कसोटी जिंकल्यावर भारतीय संघाजवळ मैदानात ‘भारत आर्मी’ पोहचली, जी भारतीय संघाला मदत करण्यासाठी मैदानात असते आणि त्यांनी भारतीय खेळाडूंचे जोरदार स्वागत केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आज झालेला सामना पाहिला, तर या कसोटीमध्ये भारतीय संघ 3-1 ने विजय मिळवू शकत होता. मात्र सततच्या पावसाने सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला गेलेला चौथा आणि शेवटचा सामना ड्रॉ करावा लागला. दरम्यान सामना ड्रॉ होऊनही भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात 2-1 ने त्यांच्याच मैदानात ऐतिहासिक विजय मिळवला.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI