पुजाराने शतक ठोकलं, तरीही प्रेक्षकांनी 'चीटर, चीटर' म्हणून चिडवलं

बंगळुरु : भारतीय संघाचा भक्कम खेळाडू अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजाराला भारतीय प्रेक्षकांच्याच रोषाला सामोरं जावं लागलं. पुजारा (नाबाद 131) आणि शेल्डन जॅक्सन (100) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. सौराष्ट्रने सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकवर पाच विकेट्स राखून मात केली. पुजारा जसा भारतीय संघाच्या मदतीला धावून जातो, …

पुजाराने शतक ठोकलं, तरीही प्रेक्षकांनी 'चीटर, चीटर' म्हणून चिडवलं

बंगळुरु : भारतीय संघाचा भक्कम खेळाडू अशी ओळख असलेल्या चेतेश्वर पुजाराला भारतीय प्रेक्षकांच्याच रोषाला सामोरं जावं लागलं. पुजारा (नाबाद 131) आणि शेल्डन जॅक्सन (100) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने तिसऱ्यांदा रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. सौराष्ट्रने सोमवारी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकवर पाच विकेट्स राखून मात केली.

पुजारा जसा भारतीय संघाच्या मदतीला धावून जातो, तसाच तो त्याच्या सौराष्ट्र या रणजी संघासाठीही धावून गेला. शतकी खेळीही केली. पण सोशल मीडियावर त्याला चीटर, चीटर म्हणून चिडवण्यात आलं. त्याचं कारणही तसंच होतं. कारण, बाद झाल्यानंतरही त्याला पंचांच्या चुकीमुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळाली.

नेमकं काय झालं?

पुजारा आर विनयच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर कर्नाटकच्या खेळाडूंनी सेलिब्रेशनही केलं. पण पंचांनी नाबाद निर्णय दिल्यानंतर सर्वच जण अवाक् झाले. पुजाराच्या बॅटला चेंडू घासून गेल्याचं समालोचकांनीही सांगितलं होतं आणि रिप्लेमध्ये तसं दिसतही होतं. पण पंचांनी नाबाद ठरवल्यानंतर कर्नाटकचे खेळाडू हतबल झाले आणि हा निर्णय मान्य करण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे पर्याय उरला नाही.

पुजाराला पंचांच्या चुकीमुळे पुन्हा खेळण्याची संधी तर मिळाली. पण ड्रेसिंग रुममध्ये जाताना त्याला प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रेक्षकांनी त्याला ‘चीटर-चीटर’ म्हणून चिडवलं. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये कर्नाटकाने दिलेल्या 279 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रने चौथ्या दिवसअखेर तीन बाद 224 धावा केल्या होत्या, ज्यामुळे अखेरच्या दिवशी विजयासाठी 55 धावांची आवश्यकता होती. सोमवारी सौराष्ट्रने कर्नाटकवर विजय मिळवला.

पुजाराची टिच्चून फलंदाजी

सोमवारी सौराष्ट्रने 244 धावांपासून पुढे खेळण्यासाठी सुरुवात केली. पाचव्या विकेटसाठी पुजाराला साथ देण्यासाठी आलेला अर्पित वसावाडा 274 धावसंख्या असताना 12 धावा करुन बाद झाला. यानंतर पुजाराने प्रेरक मानकडच्या साथीने उर्वरित पाच धावा जमवल्या आणि सौराष्ट्रला फायनलमध्ये पोहोचवलं.

या डावात पुजाराने 266 चेंडूंचा सामना केला, ज्यात 15 चौकारांचा समावेश होता. कर्नाटककडून विनय कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय अभिमन्यू मिथून आणि रोनित यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

सौराष्ट्रची लढत आता विदर्भाशी

सौराष्ट्रने 1950-51 ला रणजीमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 2012-13 आणि 2015-16 या दोन वर्षात फायनलमध्ये प्रवेश केला. आता तिसऱ्यांदा सौराष्ट्रने फायनल फेरी गाठली आहे. त्यामुळे पहिली रणजी ट्रॉफी जिंकण्याची संधी सौराष्ट्रकडे आहे.

सौराष्ट्रचा सामना 3 फेब्रुवारीपासून अंतिम सामन्यात विदर्भासोबत होणार आहे. विदर्भाने पहिल्या सेमीफायनलमध्ये केरळला एक डाव आणि 11 धावांनी हरवलं होतं. विदर्भाचीही बाजू तदडी मानली जाते. कारण, त्यांच्याकडे उमेश यादवसारखा फॉर्मात असलेला गोलंदाज आणि धावांची भूख कधीही न संपणारा वसिम जाफरसारखा अनुभवी फलंदाज आहे. वाचा40 व्या वर्षीही वासिम जाफर थकेना, 57 वं शतक झळकावलं!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *