विश्वविजेत्या इंग्लंडची आयर्लंडने हवा काढली, 85 धावात ऑलआऊट

आयर्लंडविरुद्धच्या (England vs Ireland) एकमेव कसोटीत इंग्लंडचा संपूर्ण संघ 85 धावात गुंडाळला गेला. आयर्लंडच्या टीम मुर्तघने 9 षटकात 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडरने 3 आणि बॉईड रँकिनने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

विश्वविजेत्या इंग्लंडची आयर्लंडने हवा काढली, 85 धावात ऑलआऊट

लंडन : क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर (Lords test) इंग्लंडला अत्यंत नामुष्कीचा सामना करावा लागलाय. नुकताच विश्वविजेता होण्याचा मान मिळवल्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या (England vs Ireland) एकमेव कसोटीत इंग्लंडचा संपूर्ण संघ 85 धावात (England lowest total) गुंडाळला गेला. लॉर्ड्सच्या मैदानावर (Lords test) आयर्लंडच्या टीम मुर्तघने 9 षटकात 13 धावा देत 5 विकेट्स घेतल्या, तर मार्क एडरने 3 आणि बॉईड रँकिनने 2 फलंदाजांना माघारी धाडलं.

विशेष म्हणजे इंग्लंडची अशी अवस्था ज्या मैदानावर झाली, त्याच मैदानावर इंग्लंडने विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या थरारक सामन्यात इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये आयसीसीच्या एका नियमामुळे सामना जिंकला. सुपरओव्हरमध्येही न्यूझीलंडने बरोबरीत धावा केल्या, पण इंग्लंडचे चौकार जास्त असल्याने न्यूझीलंडने सामना केला.

विश्वचषकात तुफान फॉर्मात असलेला जेसन रॉय 11 चेंडूत केवळ 5 धावा करुन बाद झाला. शिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रुट हा फक्त 2 धावा करुन माघारी परतला. वन डे संघाचा सलामीवीर फलंदाज जॉनी बेअरस्टोला खातंही उघडता आलं नाही.

गेल्या वर्षी आयर्लंडने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध पहिल्याच कसोटीत आयर्लंडने विश्वविजेत्या संघाला 85 धावात बाद केलं.

दरम्यान, निचांकी धावसंख्येत बाद होण्याची इंग्लंडची ही पहिलीच वेळ नाही. 28 जानेवारी 1887 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत इंग्लडचा संघ केवळ 45 धावात बाद झाला होता. पण आश्चर्यकारक खेळी करत इंग्लंडने हा सामना जिंकला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *