विराट कोहलीला संताप अनावर, 23 वर्षीय फलंदाजाला भर मैदानात धमकी

| Updated on: Apr 02, 2021 | 4:06 PM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला 2-1 अशा फरकाने धूळ चारली.

विराट कोहलीला संताप अनावर,  23 वर्षीय फलंदाजाला भर मैदानात धमकी
Virat Kohli
Follow us on

मुंबई : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला 2-1 अशा फरकाने धूळ चारली. या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारताने टी -20 मालिका 3-2 आणि कसोटी मालिका 3-1 अशा फरकाने जिंकली. दरम्यान भारताचा हा दौरा संपवून इंग्लंडचे बरेचसे खेळाडू मायदेशी परतले आहेत, तर काही खेळाडू आगामी इंडियन प्रिमियर लीग ही स्पर्धा खेळण्यासाठी आपआपल्या संघांसोबत सराव करत आहेत. याचदरम्यान इंग्लंडचा फलंदाज ओली पोपने (Ollie Pope) भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. (English batsman Ollie Pope reveals Indian skipper Virat Kohli’s warning during first Test)

चेन्नईत खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने आपल्याला धमकावल्याचा आरोप पोपने केला आहे. सर्वांना माहित आहे की, विराट कोहली मैदानावरील त्याच्या अॅग्रेसिव्ह आणि रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. पण पोपच्या म्हणण्यानुसार भारतीय कर्णधाराने त्याला कसोटी मालिकेतील उर्वरीत तीन सामन्यांसाठीच्या खेळपट्टीवरुन घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप पोपने केला आहे.

वास्तविक, पोप ज्या प्रसंगाचा उल्लेख करत आहे, तो प्रसंग चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात घडला होता. या कसोटीत इंग्लंडचा संघ दुसर्‍या डावात 46.3 षटकांत 178 धावांवर बाद झाला, परंतु तरीदेखील त्यांनी या सामन्यात 227 धावांनी विजय मिळवला. पोपच्या म्हणण्यानुसार या सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला धमकी दिली होती की, ही शेवटची वेळ आहे, जिथे तुम्ही सपाट खेळपट्टीवर खेळताय.

विराट माझ्याकडे आला आणि…

पोप म्हणाला की, इंग्लंडचा संघ जेव्हा दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता तेव्हा खेळपट्टीवर चेंडू चांगलाच टर्न होत होता. मी तेव्हा स्ट्रायकर एंडला उभा होतो. त्यावेळी विराट कोहली माझ्याकडे आला आणि म्हणाला, ही शेवटची वेळ आहे, जिथे तुम्ही सपाट खेळपट्टीवर खेळताय. या क्षणानंतर मला समजलं की आता उर्वरित मालिकेत फलंदाजीसाठी परिस्थिती फार कठीण असणार आहे. परिणामी पुढील तीन कसोटी सामन्यांच्या सहा डावांमध्ये इंग्लंडला 205 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत.

अहमदाबाद येथे खेळवण्यात आलेल्या तिसर्‍या कसोटीचा निकाल तर अवघ्या दोन दिवसांपेक्षा कमी वेळात भारताच्या बाजूने लागला होता. तर चौथ्या कसोटीचा निकाल तीन दिवसातच लागला. या मालिकेत पोप अपयशी ठरला. त्याला 19.12 च्या सरासरीने केवळ 153 धावा करता आल्या. 23 वर्षीय पोपने आपल्या कारकीर्दीत आतापर्यंत 17 कसोटी सामने खेळले आहेत. या 17 सामन्यांमधील 28 डावांमध्ये त्याने 31.9 च्या सरासरीने 1 शतक आणि 5 अर्धशतकांच्या मदतीने 798 धावा जमवल्या आहेत.

इतर बातम्या

Video : ‘सचिन पाजी’ला लवकर आराम मिळो, युवराजची प्रार्थना, व्हिडीओमधून वर्ल्डकपच्या आठवणी जागवल्या

वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!

रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर

(English batsman Ollie Pope reveals Indian skipper Virat Kohli’s warning during first Test)