T20 world Cup 2022 : विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंचे मीम्स व्हायरल

खेळाडूंचे अनेक मीम्स सोशल मीडियावर चाहत्यांनी व्हायरल केले आहे.

T20 world Cup 2022 : विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंचे मीम्स व्हायरल
विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वेस्ट इंडिज टीमच्या खेळाडूंचे मीम्स व्हायरल
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 22, 2022 | 7:47 AM

मागच्या रविवारी विश्वचषक स्पर्धेला (T20 world Cup 2022) सुरुवात झाल्यापासून अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले. त्यामध्ये छोट्या टीमनी मोठ्या टीमचा पराभव केला. छोट्या टीमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांची सोशल मीडियावर (Social Media) अधिक चर्चा आहे. दोनवेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्टइंडिज टीमला आर्यलंड (West Indies vs Ireland) या टीमने बाहेर काढले. जेव्हापासून विश्वचषक सुरु झालाय, तेव्हापासून मॅचमधील प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचे लक्ष आहे.


वेस्ट इंडिजच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करीत असताना पाच विकेट गमावून 146 धावसंख्या उभारली होती. त्यामुळे दोन्ही टीममध्ये संघर्ष पाहायला मिळेल असं वाटलं होतं. परंतु आर्यलंड या टीमने 17 ओव्हरमध्ये धावा धावसंख्येचं लक्ष गाठलं आणि वेस्ट इंडिज टीमला विश्वचषक स्पर्धेतून बाहेर जावं लागलं.

जेव्हापासून वेस्ट इंडिज टीम विश्वचषकाच्या बाहेर गेली आहे, तेव्हापासून त्यांच्या खेळाडूंचे अनेक मीम्स सोशल मीडियावर चाहत्यांनी व्हायरल केले आहे.