Iran Israel War : ‘जीवाची पर्वा असेल तर…’ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला मोठा इशारा, इराण…

इस्रायल-अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे फिफा वर्ल्ड कप 2026 वर गंभीर संकट आले आहे. इराणचा या विश्वचषकातील सहभाग धोक्यात आला असून, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी संघाला थेट धमकी दिली आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणच्या संघाने ट्रम्प यांना प्रत्युत्तर देत, स्पर्धेतून बाहेर काढता येणार नाही असे म्हटले आहे, ज्यामुळे तणाव वाढला आहे.

Iran Israel War : ‘जीवाची पर्वा असेल तर...’ डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला मोठा इशारा, इराण...
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Mar 13, 2026 | 12:15 PM

इस्रायल आणि अमेरिकेचं इराणशी युद्ध सुरू असल्यामुळे संपूर्ण जगात चिंतेचं वातावरण आहे. अख्ख्या जगालाही या युद्धाचे चटके या ना त्या मार्गाने सोसावे लागत आहेत. मनुष्यहानी, विध्वंस, इंधन टंचाई अशा अनेक गोष्टींमुळे नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान आत या युद्धामुळे आगामी फुटबॉल वर्ल्डकप 2026 वरदेखील आता संकट घोंगावताना दिसत आहे. यावर्षी, जून-जुलैमध्ये अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा येथे होणाऱ्या विश्वचषकात 48 संघ सहभागी होणार आहेत, ज्यामध्ये इराणचाही समावेश आहे. मात्र, गेल्या महिन्यात, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर, या वर्ल्डकपमध्ये इराणच्या सहभागावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दरम्यान, स्पर्धेचे मुख्य यजमान असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी संघाला मोठी धमकी दिल्याने सर्वांना धक्का दिला आहे.

कधी सुरू होणार वर्ल्डकप ?

2026 चा फिफा वर्ल्ड कप हा 11 जून (भारतात 12 जून) ते 19 जून या कालावधीत खेळला जाणार आहे. इराणला न्यूझीलंड, बेल्जियम आणि इजिप्तसह ग्रुप जी मध्ये स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे इराण त्यांचे तीनही ग्रुप स्टेज सामने अमेरिकेत खेळणार आहे. मात्र आता अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून केलेल्या हल्ल्यानंतर, इराणी संघ कदाचित वर्ल्डकपमध्ये सहभागी होणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे. एवढंच नव्हे तर इराणच्या क्रीडामंत्र्यांनी थेट जाहीर केलं ती त्यांचा फुटबॉल संघ अमेरिकेत पाठवू शकणार नाहीत.

इराणच्या फूटबॉल टीमला ट्रम्प यांची धमकी

इराणच्या क्रीडामंत्र्यांच्या घोषणेच्या एक दिवसानंतर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणी फुटबॉल संघाला थेट धमकी दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील पोस्टमध्ये ट्रम्प यांनी लिहिलं की, “इराणी फुटबॉल संघाचे वर्ल्डकपमध्ये स्वागत आहे, परंतु जर त्यांना त्यांचा जीव आणि सुरक्षिततेची काळजी असेल तर त्यांनी येथे यावं असं मला वाटत नाही. हा मुद्दा प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद.” अशी पोस्ट त्यांनी लिहीली असून मोठी धमकी मानली जात आहे.

 

इराणच्या टीमचा ट्रम्पवर पलटवार

ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर, इराणी फुटबॉल संघानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं, त्यांनीही सोशल मीडियावर एक निवेदन पोस्ट केलं. वर्लडकपसारखी ऐतिहासिक स्पर्धा कोणत्याही एका देशाने नव्हे तर एका संघटनेने आयोजित केली आहे. आम्ही स्वतःच्या ताकदीवर आणि क्षमतेमुळे या वर्ल्डकपसाठी पात्र ठरलो आहेत आणि कोणीही आम्हाला वर्ल्डकपमधून बाहेर ठेवू शकत नाही, असं त्यांनी लिहीलं. एवढंच नव्हे तर अमेरिकेलाच या स्पर्धेतून बाहेर काढलं पाहिजे कारण ते फक्त नावापुरते यजमान आहेत, पण यजमानांसारखे वागत नाही आणि संघांना सुरक्षा प्रदान करण्यात अपयशी ठरत आहेत, असंही इराणच्या संघाने सुनावलं.

 

 

Follow Us