AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गब्बर अडचणीत, ईडीकडून शिखर धवनची तब्बल 8 तास चाैकशी, क्रिकेटरच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, वाचा प्रकरण नेमकं काय

भारताचा माजी स्टार क्रिकेटर शिखर धवन हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे. काही दिवसांपूर्वीच क्रिकेटर पहिल्या घटस्फोटानंतर पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. मात्र, आता त्याच्या अडचणीत वाढ झालीये. ईडीकडून शिखरची आठ तास चाैकशी करण्यात आलीये.

गब्बर अडचणीत, ईडीकडून शिखर धवनची तब्बल 8 तास चाैकशी, क्रिकेटरच्या समस्यांमध्ये मोठी वाढ, वाचा प्रकरण नेमकं काय
Shikhar Dhawan
| Updated on: Sep 05, 2025 | 10:09 AM
Share

भारताचा माजी क्रिकेटर शिखर धवन यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये. बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी शिखर धवनची तब्बल आठ तास चौकशी केली. शिखर धवन हा सकाळी 11 च्या सुमारास दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात दाखल झाला होता. तिथे त्याची तब्बल आठ तास चाैकशी करण्यात आली. संध्याकाळी 7 च्या सुमारास शिखर हा ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडताना दिसला. फक्त शिखर धवन हाच नाही तर सुरेश रैना हा देखील ईडीच्या रडारावर आहे. आता हे स्पष्ट झालंय की, शिखर धवन याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झालीये. क्रिकेटवर गंभीर आरोप करण्यात आली.

13 बेट नावाच्या बेकायदेशीर बेटिंग अॅपचे प्रकरण क्रिकेटरला भोवताना दिसत आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पीएमएलए त्याचा जबाब नोंदवला असल्याचे सांगितले जात आहे. काही जाहिरातींच्या माध्यमातून शिखर धवन हा अॅपशी जोडला गेलाय. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चाैकशीत या संबंधित अॅपबद्दल त्याला प्रश्न विचारले आणि तो नेमका या अॅपसोबत कसा जोडला गेल्या, याची माहिती त्याच्याकडून घेण्यात आली.

अनेक लोकांची आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर आहे. यासोबतच या कंपनीने मोठा कर देखील चुकवला आहे. हेच नाही तर याप्रकरणी माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याची देखील चाैकशी करण्यात आलीये. केंद्र सरकारने ऑनलाईन गेम कंपनींबद्दल काही दिवसांपूर्वीच मोठा निर्णय घेतला. त्यामध्येच आता ईडीकडून थेट भारतीय क्रिकेटरची चाैकशी होत असल्याने चांगलीच मोठी खळबळ उडाली आहे.

तपास संस्थांचा अंदाज आहे की अशा विविध ऑनलाइन बेटिंग अॅप्सचे सुमारे 22 कोटी भारतीय वापरकर्ते आहेत. यापैकी निम्मे सुमारे 11 कोटी नियमित वापरकर्ते आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतातील ऑनलाइन बेटिंग अॅप्सची बाजारपेठ 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे आणि ती ३० टक्क्यांच्या दराने वाढत आहे. हेच नाही तर या कंपन्यांचे मुख्यालय हे भारतात नसून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, स्पेन या देशांमध्ये आहे. मात्र, भारतामध्ये या कंपन्या कोट्यावधींची उलाढाल करत आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.