AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: त्याने शाळेत जावं, गल्ली क्रिकेट खेळावं, वैभवच्या पदार्पणावर असं कोण आणि का म्हणालं?

भारत इंग्लंड यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेत तरी वैभव सूर्यवंशीला संधी मिळावी अशी सगळ्यांची इच्छा आहे पण एका माजी फलंदाजांने जे विधान केले त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Vaibhav Sooryavanshi: त्याने शाळेत जावं, गल्ली क्रिकेट खेळावं, वैभवच्या पदार्पणावर असं कोण आणि का म्हणालं?
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 02, 2026 | 9:47 AM
Share

आजकाल क्रिकेट विश्वात वैभव सूर्यवंशी हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप पाडल्यानंतर, वैभव आता आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. तो सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्ध मालिकेत वैभवला पदार्पणाची संधी मिळाली नाही तर असे वाटले होते की इंग्लंडविरुद्ध मिळेल, पण वैभवला पहिल्या सामन्यात तरी संधी मिळालेली नाही आता उर्वरित सामन्यात तरी संधी मिळते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पण आता सर्वत्र वैभवचे कौतुक होत असताना एका माजी क्रिकेटपटूच्या विधानाने खळबळ झाली आहे.

क्रिकइन्फोसाठी लिहिलेल्या एका स्तंभात कलिनान यांनी लिहिले, “वैभव सूर्यवंशीमध्ये आपल्याला केवळ आपल्या वयापेक्षा अधिक प्रगल्भ खेळणारा एक प्रतिभावान मुलगा दिसत नाही. क्रिकेटने यापूर्वी असे काहीही पाहिले नाही. एक असे मूल जे आतापर्यंतच्या सर्वात व्यावसायिकदृष्ट्या शक्तिशाली, जागतिक स्तरावर प्रसिद्ध आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील क्रीडा वातावरणाच्या केंद्रस्थानी आहे: भारतीय क्रिकेट आणि आयपीएल.”

गंभीर चिंतनाची गरज ते म्हणाले, “क्रिकेटने अनेक अपवादात्मक प्रतिभावान खेळाडू घडवले आहेत. असेही तरुण खेळाडू आहेत ज्यांना खूप लहान वयातच ओळख मिळाली आणि त्यांना असे खेळाडू म्हणून ओळख मिळाली, जे त्यांना कधीच व्हायचे नव्हते. पण निरागसता, अपवादात्मक प्रतिभा आणि सोशल मीडियाच्या जगाने एका लहान मुलापासून लाखो लोकांच्या मतांपर्यंतचे अंतर जवळजवळ मिटवून टाकले आहे. सूर्यवंशी 15 वर्षांचा आहे आणि त्याचे आयुष्य वाढत्या वयाच्या सामान्य गतीने पुढे जात नाहीये. खूप उशीर होण्यापूर्वी यावर गंभीर विचार करणे आवश्यक आहे. माझ्या मते, त्याने घरी राहून परीक्षेची तयारी करावी, मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळावे आणि जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत एका सामान्य मुलासारखे जगावे. याचा अर्थ असा नाही की त्याच्या प्रतिभेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की, प्रतिभा असलेल्या व्यक्तीला ती पूर्णपणे विकसित करण्याची संधी मिळाली तरच तिच्या योग्य वापराचा उपयोग होऊ शकतो.”

वैभवने धुमाकूळ घातला वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.31च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या. या काळात वैभवने 63 चौकार आणि 72 षटकार मारले. त्याने 5 अर्धशतके आणि एक शतकही झळकावले. या कामगिरीमुळे त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात