AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा डी गुकेश याला बुद्धिबळाचा बादशाह बनवण्यासाठी वडिलांनी सोडली नोकरी, आईने सांभाळले घर, आई-वडिलांच्या त्यागामुळे बनला विश्वचॅम्पियन

Indian grandmaster D Gukesh chess champion: गुकेश याच्याकडे बुद्धिबळसाठी जेव्हा कोणी प्रायोजक नव्हता तेव्हा त्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आणि क्राउड फंडिंगमधून (जनतेकडून निधी मिळवणे) आर्थिक वाट काढली. अनेक आव्हानानंतर मागील वर्षी भारताचे नंबर वन बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदचा पुढे गुकेश मागील वर्षी गेला.

मुलगा डी गुकेश याला बुद्धिबळाचा बादशाह बनवण्यासाठी वडिलांनी सोडली नोकरी, आईने सांभाळले घर, आई-वडिलांच्या त्यागामुळे बनला विश्वचॅम्पियन
chess champion
| Updated on: Dec 15, 2024 | 11:52 AM
Share

Gukesh vs Ding World Chess Championship: चीनच्या डिंग लिरेन याला पराभूत करुन भारताचा डी.गुकेश बुद्धिबळाचा नवीन विश्वविजेता बनला आहे. डी.गुकेश याने जगातील सर्वात युवा विश्वविजेता होण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. परंतु त्याची ही वाटचाल सोपी नव्हती. गुकेश याच्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी केलेला संघर्ष मोठा होता. वडिलांनी त्याच्यासाठी नोकरी सोडली होती. मुलाच्या मोठ्या उद्दिष्टासाठी क्राउड-फंडिंग घेण्यात त्यांनी संकोच केला नाही.

वडिलांनी सोडला वैद्यकीय व्यवसाय

डी.गुकेश केवळ 18 व्या वर्षी बुद्धिबळाचा विश्वविजेता बनला. या सर्वोच्च पातळीवर पोहचण्यासाठी डी.गुकेश याच्या आई-बाबांनी मोठा त्याग केला आहे. त्याचे वडील रजनीकांत ईएनटी सर्जन आहेत. आई पद्मा माइक्रोबायोलॉजिस्ट आहे. मुलासाठी रजनीकांत यांना 2017-18 आपली वैद्यकीय प्रॅक्टीस थांबवावी लागली. त्याने वैद्यकीय व्यवसाय बंद करुन संपूर्ण लक्ष मुलावर केंद्रीत केले. पिता-पुत्राच्या या जोडीने मोजक्या पैशांमध्ये बुद्धिबळासाठी जगभरात भ्रमन केले. जेव्हा गुकेश ग्रॅण्ड मास्टरचा किताब मिळवण्याचा शेवटच्या टप्प्यात होता, तेव्हा त्याची आई घरखर्च सांभाळत होती. कारण वडिलांनी वैद्यकीय व्यवसायही सोडला होता.

गुकेश आई-वडिलांसोबत

प्रायोजन नव्हता, लोकांकडून मिळवला निधी

गुकेश याच्याकडे बुद्धिबळसाठी जेव्हा कोणी प्रायोजक नव्हता तेव्हा त्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम आणि क्राउड फंडिंगमधून (जनतेकडून निधी मिळवणे) आर्थिक वाट काढली. अनेक आव्हानानंतर मागील वर्षी भारताचे नंबर वन बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंदचा पुढे गुकेश मागील वर्षी गेला. गुकेशने बुद्धिबळासाठी नियमित शाळेत जाणेही थांबवले होते.

शाळेत असताना गुकेळ ग्रँडमास्टर बनला

घरात अनौपचारिक खेळातून सुरुवात

18 वर्षीय गुकेश चेन्नईत राहणार आहे. चेन्नई देशाच्या बुद्धिबळाची राजधानी म्हणून ओळखले जाते. देशभरात जे चॅम्पियन झाले, ते या शहरातून झाले आहे. गुकेश परिवारात यापूर्वी बुद्धिबळ खेळणारा कोणीही खेळाडू नव्हता. त्याने बुद्धिबळाची सुरुवात घरात अनौपचारिक खेळातून केली. आपल्या घरात बुद्धिबळाचा श्रीगणेशा करत पाया पक्का केला. चांगल्या बुद्धिबळ खेळाडूची प्रतिभा त्याच्यात लहानपणापासून दिसत होती. आई-वडिलांनी त्याची क्षमता ओळखून त्याचे प्रशिक्षण सुरु केले. त्याला शाळेतून नेहमी प्रोत्साहन मिळाले. शाळेत असताना त्याने ग्रँडमास्टरचा किताब मिळवला होता.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.