MI vs KKR : मुंबई इंडियन्स जिंकल्यानंतर हार्दिक पंड्या शार्दुल ठाकूरच्या भविष्याबद्दल जे मनात आहे ते बोलला
MI vs KKR : मुंबई इंडियन्सने काल सलामीच्या सामन्यात विजय मिळवला. पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होता. मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये सलामीचा सामना जिंकणं 13 वर्षानंतर शक्य झालं. या विजयात शार्दुल ठाकूरने महत्वाचं योगदान दिलं.

मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने त्या गिफ्टचा उल्लेख सुद्धा केला. तुम्ही विचार करत असाल हे गिफ्ट काय आहे? शार्दुल ठाकूरला मिळणारं हे गिफ्ट विश्वासाचं आहे. टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन हार्दिक पंड्याने शार्दुलला दिलेला शब्द आहे. हा तोच शार्दुल ठाकूर आहे, जो 2010 साली नेट बॉलर म्हणून मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झालेला. आयपीएल 2026 मध्ये त्याची 14 वर्षांचाी प्रतिक्षा संपुष्टात आली. 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सने सलामीचा सामना जिंकला. IPL 2026 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्ससमोर 221 धावांचं अवघड लक्ष्य ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सने 6 विकेट राखून विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सच्या या विजयात शार्दुल ठाकूर प्लेयर ऑफ द मॅच ठरला. त्याने 4 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन KKR चे 3 महत्वाचे विकेट्स काढले. फिन एलन, कॅमरुन ग्रीन आणि अजिंक्य रहाणेला आऊट केलं. मॅच संपल्यानंतर हार्दिक पंड्या पत्रकार परिषदेत आला. त्यावेळी त्याने आपल्या सर्वात यशस्वी गोलंदाजाचं भरभरुन कौतुक केलं.
शार्दुलचं कौतुक करताना हार्दिक पंड्या काय म्हणाला?
हार्दिक पंड्या बोलला की, “मी शार्दुल ठाकूर बोललोय की, या सीजनमध्ये फ्रेंचायजीला तुझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत” “शार्दुलचं यापुढे आता सर्व करिअर मुंबई इंडियन्ससोबतच असावं असं हार्दिकने सांगितलं. तो एक मोठा प्लेयर आहे, परिस्थितीला घाबरत नाही” असं हार्दिक पंड्या त्याचं कौतुक करताना म्हणाला.
शार्दुल याआधी कुठल्या, कुठल्या टीम्सकडून खेळलाय?
शार्दुल ठाकूरचा खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्स सोबत हा पहिला सीजन आहे. याआधी तो आयपीएलच्या पाच टीम्सकडून खेळलाय. चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्य या टीमकडून शार्दुल खेळलाय.
कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट गमावून 220 धावा केल्या. मुंबई इंडियन्सने 20 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. मुंबईने 6 विकेट आणि पाच चेंडू राखून विजय मिळवला.