
भारत आणि इंग्लंडमध्ये शेवटच्या कसोटी सामन्यात वेगवान शतक झळकवणाऱ्या यजमान टीमच्या खेळाडूने टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा निर्णय धुडकावला आहे. या फलंदाजाने जो रुट सोबत मिळून इंग्लंडच्या टीमला विजयाच्या समीप पोहोचवलं होतं. पण हे दोघे आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने मॅचमध्ये शानदार पुनरागमन केलं. मॅचची दिशा आपल्या बाजूला वळवली. मॅचनंतर कॅप्टन शुबमन गिल आणि हॅरी ब्रूकची प्लेयर ऑफ द सीरिजच्या पुरस्कारासाठी निवड केली. त्यावर हॅरी ब्रूकने प्रश्नचिन्ह निर्माण केलय. त्याने रुट या पुरस्कारासाठी योग्य असल्याच म्हटलं आहे.
इंग्लंडमध्ये दोन प्लेयर ऑफ द सीरीज निवडले जातात. याची निवड दोन्ही टीम्सचे कोच करतात. इंग्लंडचे हेड कोच ब्रेंडन मॅकुलम यांनी टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलची प्लेयर ऑफ द सीरीज पुरस्कारासाठी निवड केली. तेच टीम इंडियाच्या कोचने ओव्हलमध्ये टेस्टमध्ये शतक झळकावणाऱ्या हॅरी ब्रूकची निवड केली. एका इंटरव्यूमध्ये ब्रूकने गंभीरचा हा निर्णय मान्य नसल्याच सांगितलं. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुट या पुरस्काराचा मानकरी असल्याचं सांगितलं.
53.44 च्या सरासरीने 481 धावा
“मी जो रुट इतक्या धावा केल्या नाहीत. म्हणून मला वाटतं की, रूटची प्लेयर ऑफ द सीरीज किंवा मॅन ऑफ द सीरीज पुरस्कारासाठी निवड केली पाहिजे. तो अनेक वर्षांपासून शानदार प्रदर्शन करतोय” हॅरी ब्रूकने या टेस्ट सीरीजमध्ये 53.44 च्या सरासरीने 481 धावा केल्या. यात द ओव्हलमध्ये शेवटच्या दिवशीच्या 111 धावांच्या खेळीचा सुद्धा समावेश आहे.
….पण असं घडलं नाही
ब्रूक बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलमध्ये बोलला की, “मी आणि रुट बॅटिंग करत होतो, तेव्हा असं वाटतं होतं की आम्ही विजयाच्या दिशेने चाललो आहे. शक्य तितक्या लवकर धावा बनवण्याचा माझाा प्रयत्न होता. मी आणि रुट अजून काहीवेळ मैदानात राहिलो असतो, तर खेळ लवकर संपवला असता. पण असं घडलं नाही”
शुबमन गिलनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज कोण?
ब्रूक आणि रुट आऊट होताच इंग्लंडचा दुसरा डाव 367 धावांवर आटोपला. रुट या सीरीजमध्ये शुबमन गिलनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. त्याने 5 टेस्ट मॅचमध्ये 67 च्या सरासरीने 537 धावा केल्या आहेत. यात तीन शतक आणि एक अर्धशतक आहे.