AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयने अचानक बदलला संघ, IND vs AFG सामन्यापूर्वी गंभीरच्या ‘लाडक्या खेळाडू’ला केले संघात सामील

भारत आणि अफगाणिस्तान या मालिकेतील तिसरा आणि एकदिवसीय सामना आता 20 जून रोजी रंगणार आहे. या सामन्यापूर्वी संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने हा बदल नुकताच जाहीर केला आहे.

बीसीसीआयने अचानक बदलला संघ, IND vs AFG सामन्यापूर्वी गंभीरच्या 'लाडक्या खेळाडू'ला केले संघात सामील
harshit rana team india
| Updated on: Jun 19, 2026 | 10:54 AM
Share

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने पार पडले असून भारतीय संघाने दोन्ही सामने जिंकले असून मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता भारतीय संघ तिसरा आणि शेवटचा सामना 20 जून रोजी चेन्नईमध्ये खेळणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने संघात ऐनवेळी मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने या शेवटच्या सामन्यासाठी संघात प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या लाडक्या खेळाडूला सामील केले आहे. बीसीसीआयने आणखी एका गोलंदाजाचा समावेश संघात केला आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात एकमेव बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने या बदलाची घोषणा आजच केली आहे.

बीसीसीआयने जाहीर केली की, तिसऱ्या आणि अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात हर्षित राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे. तो आता दुखापतीतून बरा झाला आहे. हर्षितने बेंगळुरुमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये आपले पूनर्वसन पूर्ण केले असून फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. यानंतर आता तो चेन्नईमध्ये भारतीय संघासोबत सामील झाला आहे.

हर्षित राणा मागील काही महिन्यांपासून दुखापतीचा सामना करत होता. टी- 20 वर्ल्ड कपच्या 2026 च्या संघात त्याला सामील केले होते पण वर्ल्ड कप सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना त्याला दुखापत झाली आणि त्याला वर्ल्ड कपमध्ये एकही सामना खेळता आलेला नाही. दुखापतीमुळे तो आयपीएल 2026 मध्येही खेळू शकला नाही.

या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांसाठीच्या भारतीय टी-20 संघाचीही घोषणा बीसीसीआयने केली आहे. या दोन्ही दौऱ्यांसाठी हर्षितला संघात सामील करण्यात आले आहे. यामुळे हर्षितला या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी मैदानावर परतण्याची एक महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात राणाच्या समावेशामुळे गोलंदाजीचे पर्याय वाढले आहेत. आता हर्षितला संघात सामील केल्यानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी