विराटने स्टीव्ह स्मिथची माफी का मागितली?

भारतीय संघ फलंदाजी करत होता, त्यावेळी स्टीव्ह स्मिथ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी मागे प्रेक्षक गॅलरीतील भारतीय प्रेक्षकांनी स्मिथला चिडवण्यास सुरुवात केली.

विराटने स्टीव्ह स्मिथची माफी का मागितली?

लंडन : विश्वचषकाच्या दुसऱ्या लढाईत भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी मात केली. भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या धडाकेबाज शतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर 353 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलं होतं. कांगारुंना हे आव्हान पेलवलं नाही. त्यांचा संघ 316 धावांत गुंडाळला. भारताने हा सामना जिंकला मात्र तरीही कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथची माफी मागितली.

विराटने माफी का मागितली?

भारतीय संघ फलंदाजी करत होता, त्यावेळी स्टीव्ह स्मिथ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी मागे प्रेक्षक गॅलरीतील भारतीय प्रेक्षकांनी स्मिथला चिडवण्यास सुरुवात केली. भारतीय प्रेक्षक स्टीव्ह स्मिथला चीटर चीटर म्हणून ओरडत होते. हे सर्व विराट कोहली फलंदाजी करत होता त्यावेळीच घडलं.

त्यावेळी स्वत: विराट कोहलीने फलंदाजी सोडून फॅन्सकडे इशारा करुन हे थांबवण्यास बजावलं. इतकंच नाही तर स्मिथला न चिडवता टाळ्या वाजवून त्याचा उत्साह वाढवण्याची विनंती केली. त्यानंतर फॅन्सनीही तेच केलं.

विराट कोहली काय म्हणाला?

या सामन्यानंतर विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं मांडलं. “विराट म्हणाला तो (स्टीव्ह स्मिथ) क्रिकेट खेळतोय, त्याच्यासोबत जे झालं, तो भूतकाळ आहे. भारतीय संघाचे समर्थक इथे आहेत. मात्र त्यांच्यामुळे कोणाला त्रास होईल असं वर्तन नको”

प्रेक्षकांच्या वर्तनामुळे मला वाईट वाटलं, त्यामुळे मी प्रेक्षकांच्यावतीने माफी मागतो असं मी स्मिथला सांगितलं, असं कोहली म्हणाला.

स्मिथकडून जी चूक (बॉल टॅम्परिंग) झाली आहे, त्यासाठी तो खजील आहे. त्याने माफीही मागितली आहे. आता तो योग्यरित्या क्रिकेट खेळत आहे, असं कोहलीने सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *