
अर्शी खान... नाव वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात असेल ना... ही तिच मॉडेल आहे जिने याअगोदर टीम इंडियाच्या बऱ्याचश्या मॅचेसदरम्यान चर्चांचं वादळ उठवलं होतं. 2016 टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याआधी, टीम इंडिया हा सामना जिंकल्यास मी माझे कपडे काढेन, असं अर्शी खान म्हणाली होती. ती नुसती म्हणूनच थांबली नाही तर खरंच तिने तिची कपडे काढले देखील.. तसे काही फोटोही तिने प्रसिद्ध केले होते.

आता अर्शी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने आता आपल्या रिलेशनशीपबद्दल खुलास केलाय. मला वाईट वाटतंय की आता कुणासोबतही रिलेशनमध्ये नाही तसंच माझा कुणी बॉयफ्रेंड नाही. बिग बॉस 14 मध्ये चॅलेंजर एन्ट्री करणारी अर्शी खान म्हणते, 'मला वाटतं की आता रिलेशनशिपमध्ये येण्याची वेळ आली आहे. मी मिस्टर राईटची वाट पाहत आहे, मला आशा आहे की लवकरच मला माझं प्रेम मिळेल.'

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु असताना अर्शी खानलाही नुकतीच कोरोना विषाणूची लागण झाली होती. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तिला कोरोनाने ग्रासलं दिली. मात्र, ती आता कोरोनातून सावरली आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीशी तिचे प्रेमसंबंध असल्याचा दावाही अर्शी खानने केला होता. तसंच आम्हाला एक मुलगा आहेत, असा गौप्यस्फोटही तिने केला होता. मात्र आफ्रिदीने अर्शीचे दावे फेटाळून लावले होते. नंतर अर्शीविरुद्ध फतवाही जारी करण्यात आला होता.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर शो करण्याचा मी आनंद घेत आहे. 'मी वेब प्लॅटफॉर्मवर चांगलं काम करत आहे. टीव्हीसाठी मला ऑफर येत आहेत पण मला ग्लॅमरस पात्र साकारण्याची इच्छा आहे. माझ्या प्रेक्षकांना आवडणारी आणि खरी वाटणारी अशी व्यक्तिरेखा.... मी 'सास बहू' सीरियलचा भाग होऊ शकत नाही. रिअॅलिटी टीव्ही शोचा भाग असल्याचा मला आनंद आहे, असं अर्शीने आपल्या वेब प्लॅटफॉर्मच्या कामाबद्दल बोलताना सांगितलं.