जण गण मन…पाकिस्तानच्या स्टेडियममध्ये भारतीय राष्ट्रगीताचे सूर, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड मॅचपूर्वी उडाली धावपळ, Video पाहाच
Jan Gan Man in Pakistan Stadium : पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद घेतले, पण त्यातच त्यांची दमछाक होताना दिसत आहे. भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला असला तरी लाहोरच्या मैदानावर भारतीय राष्ट्रगीताचे सूर उमटले. त्यामुळे एकच धावपळ उडाली.

ICC Champions Trophy 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (Australia vs England) हे बलाढ्य संघ आमने-सामने आहेत. दोन्ही संघ हे लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर सामना खेळत आहेत. पण सामना सुरू होण्यापूर्वीच एक जबरदस्त घटना घडली. गद्दाफी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाच्या राष्टगीताऐवजी भारतीय राष्टगीताचे सूर उमटले. जन गण मन हे सूर वाजताच प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतले. आयोजकांची ही चूक वेळीच लक्षात आली. त्यांनी लागलीच ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत लावले. पण तोपर्यंत एकच धावपळ उडाली.
जेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन्ही संघ, राष्ट्रगीतासाठी मैदानात आल्या. ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू करण्याऐवजी स्थानिक व्यवस्थापक संघाने भारताचे राष्ट्रगीत सुरू केले. या विषयीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाचा ध्वज फडकताना दिसत आहे. पण त्याला जन गण मन हे राष्ट्रगीत सुरू झाले. अवघ्या काही सेकंदात भारतीय राष्ट्रगीत बंद करून ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्यावेळी प्रेक्षकांनी एकच गोंधळ केला. तो आवाजही ऐकू आला.
यापूर्वी लोगोतून पाकिस्तानचे नाव गायब
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लाईव्ह प्रक्षेपणादरम्यान यजमान देशाचे नाव लोगोतून गायब झाले होते. भारत-बांग्लादेश सामन्या दरम्यान हा प्रकार घडला होता. न्युझीलंडसोबत पाकिस्तानचा सामना झाला, त्यावेळी लाईव्ह लोगोमध्ये पाकिस्तानचे नाव होते. एकाच टुर्नामेंटच्या दोन सामन्यातील हा फरक लागलीच प्रेक्षकांनी टिपला. त्यावरून पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आयसीसीने ग्राफिक्सचे तांत्रिक कारण पुढे करत त्यावर पडदा टाकला होता. पण पाकिस्तानमधील चाहत्यांनी हा खोडसाळपणा असल्याचा दावा केला होता. यजमान देशाचे नाव मॅचमध्ये नसल्याने त्यांचा हिरमोड झाला होता.
🤣🤣🤣 #AusVsEng pic.twitter.com/vy8YdpYyc9
— Sunny (@CricketKiBaat01) February 22, 2025
जर्सीवरून झाला होता वाद
भारताने सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर आयोजक पाकिस्तानचे नाव नसल्याने एकच खळबळ उडाली होती. पण असला कुठलाही प्रकार झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा वाद शमला होता.
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्टीव स्मिथ याच्या नेतृत्वात संघ पहिल्यांदा गोलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांची सुरूवात चांगली राहिली. 100 धावांमध्ये इंग्लंडचे दोन फलंदाज तंबूत परतले होते. आता या सामन्यात कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल.
