टी 20 विश्वचषक: भारताचा पहिला सामना आफ्रिकेविरुद्ध!

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने टी 20 विश्वचषक 2020 चं वेळापत्रक जाहीर केलं. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेण्टी विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. 8 शहरातील 13 मैदानांवर विश्वचषकासाठीचे सामने खेळवण्यात येतील. पुरुष आणि महिला टी 20 विश्वचषक एकाच देशात म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहेत. महिला टी 20 विश्वचषक 21 फेब्रुवारी 2020 ते 8 मार्च 2020 …

टी 20 विश्वचषक: भारताचा पहिला सामना आफ्रिकेविरुद्ध!

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने टी 20 विश्वचषक 2020 चं वेळापत्रक जाहीर केलं. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी ट्वेण्टी विश्वचषक खेळवण्यात येणार आहे. 8 शहरातील 13 मैदानांवर विश्वचषकासाठीचे सामने खेळवण्यात येतील. पुरुष आणि महिला टी 20 विश्वचषक एकाच देशात म्हणजे ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येणार आहेत.

महिला टी 20 विश्वचषक 21 फेब्रुवारी 2020 ते 8 मार्च 2020 पर्यंत आयोजित केला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिवस अर्थात 8 मार्चला महिला विश्वचषकाची फायलन लढत होईल.

दुसरीकडे पुरुषांचा टी 20 विश्वचषक 18 ऑक्टोबर 2020 ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत खेळवण्यात येईल.

विराट कोहलीच्या टीम इंडियाचा पहिला सामना 24 ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल. भारताच्या पुरुषांच्या क्रिकेट संघाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तानसह अन्य दोन पात्रता फेरीत प्रवेश केलेल्या संघांसह ग्रुप 2 मध्ये स्थान मिळालं आहे. या गटात भारताचा पहिला मुकाबला आफ्रिकेशी होणार आहे.

दुसरीकडे ग्रुप 1 मध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंडसह अन्य दोन पात्र संघ असतील.

विश्वचषकाची पहिली सेमी फायनल 11 तर दुसरी सेमी फायनल 12 नोव्हेंबरला होईल. 15 नोव्हेंबरला फायलन लढत खेळवण्यात येईल.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *