Icc Odi World Cup 2027 : टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस, कोण ठरणार यशस्वी?

Icc odi World Cup 2027 : टीम इंडियाचं 2023 साली वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंग झालं होतं. भारताला तेव्हा उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे टीम इंडिया 2027 च्या स्पर्धेत वनडे वर्ल्ड कप आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

Icc Odi World Cup 2027 : टीम इंडियाचं मिशन वनडे वर्ल्ड कप, एका जागेसाठी तिघांमध्ये चुरस, कोण ठरणार यशस्वी?
Shivam Hardik And Axar Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 25, 2026 | 11:56 PM

टीम इंडियाने आयसीसीच्या स्पर्धेत गेल्या 2 वर्षात जबरदस्त कामगिरी केलीय. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2024 साली टी 20i वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर 2025 मध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत करुन आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर भारताने मायदेशात 2026 मध्ये सलग दुसऱ्यांदा टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर आता टीम इंडियाचं पुढील मिशन हे वनडे वर्ल्ड कप 2027 आहे. त्या हिशोबाने टीम मॅनेजमेंटकडून तयारी सुरु झाली आहे.

Follow Us