AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा पाय खोलात; गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?

Unmesh Patil : चाळीसगाव शहरात रविवारी झालेल्या जनआक्रोश धरणे आंदोलनानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा पाय खोलात; गुन्हा दाखल, नेमकं कारण काय?
Unmesh PatilImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jun 29, 2026 | 10:15 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर आली आहे, चाळीसगाव शहरात रविवारी झालेल्या जनआक्रोश धरणे आंदोलनानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार उन्मेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कालच्या आंदोलनादरम्यान केलेल्या भाषणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाविषयी आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्दांचा वापर केल्यामुळे हा गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता उन्मेश पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाटील यांचा PSI वर गंभीर आरोप

उन्मेश पाटील यांनी आपल्या भाषणात एक पोलीस उपनिरीक्षक एका महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी करीत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी पाटील यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.

आम्ही गुंडांचा बंदोबस्त करणारे आहोत

उन्मेश पाटील यांनी म्हटले की, उद्यापर्यंत पोलिस अधीक्षकांनी यावर कारवाई करावी, अन्यथा विधिमंडळात सभागृहात नेत्यांना सांगून विषय मांडू. पुढे बोलताना पाटील यांनी, स्थानिक आमदाराच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत असल्याचा आरोप केला. तसेच आम्ही छत्रपतींचे मावळे, आम्हाला संस्कार आहे, आम्ही अधिकाऱ्यांकडून राजकारण करणारे षंड नाही, आम्ही गुंडांचा बंदोबस्त करणारे आहोत असं विधान केलं आहे.

सत्ताधाऱ्यांनी महिलेला न्याय द्यावा

पुढे बोलताना पाटील यांनी, ‘रायगडला वारी म्हणून येणारे तुम्ही जर मावळे असाल तर चाळीसगावच्या त्या महिलेला न्याय मिळवून द्या’ असे आव्हान उन्मेष पाटील यांनी भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांना दिले आहे. ‘आमदार मंगेश चव्हाण सत्ताधाऱ्यांच्या जवळचे आहेत, मग महिलेला न्याय द्या, फक्त बोगस काम करण्यासाठी जवळचे राहू नका. नुसते कलेक्शन करायला तुम्हाला ठेवलं नाही,’ असा टोला देखील उन्मेष पाटील यांनी लगावला आहे. दरम्यान आता गुन्हा दाखल झाल्याने आता उन्मेश पाटील यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा