Irfan Pathan : World Cup 2027 मध्ये खेळायचं असेल तर…इरफान पठाणचा रोहित शर्मा, विराट कोहलीला एकदम परफेक्ट सल्ला
Irfan Pathan : आता पुढचा वनडे वर्ल्ड कप 2027 साली आहे. त्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार का? हा मोठा प्रश्नच आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने या बद्दल महत्वाच वक्तव्य केलं आहे. 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दोघांना खेळायचं असेल, तर काय करावं लागेल? या बद्दल इरफानने मोलाचा सल्ला दिला आहे.

रोहित शर्माला वनडे टीमच्या कॅप्टनशिपवरुन हटवण्यात आलं आहे. त्याच्याजागी शुबमन गिलकडे संघाचं नेतृत्व देण्यात आलय. पण रोहित शर्माच टीममधील स्थान कायम आहे. पुढचा वनडे वर्ल्ड कप अजून दोन वर्षांनी 2027 साली आहे. त्यात रोहित शर्मा खेळेल, ही शक्यता धुसर दिसतेय. विराट कोहलीची सुद्धा हीच स्थिती आहे. भारताच्या या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटुंनी टी 20 आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. ते फक्त वनडे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये Active आहेत. क्रिकेटच्या तीन फॉर्मेटपैकी फक्त एका फॉर्मेटमधून खेळून टीममध्ये कधीपर्यंत ते आपलं स्थान टिकवू शकतात? हे लवकरच समजेल. या दरम्यान ऑलराऊंडर इरफान पठाणने दोघे वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये कसे खेळू शकतात? याबद्दल एक सल्ला दिला आहे. वनडे वर्ल्ड 2027 मध्ये खेळणं हे रोहित आणि विराटच एक स्वप्न आहे.
इरफान पठाण आपल्या युटयूब चॅनलवर बोलत होता. तो म्हणाला की, “रोहित शर्मा आणि विराट कोहलीला 2027 सालचा वनडे वर्ल्ड कप खेळायचा आहे. पण फिटनेस त्यांच्यासाठी एक मोठं आव्हान आहे“ “रोहितने आपल्या फिटनेसवर चांगलं काम केलय. तो यावरच लक्ष केंद्रीत करतोय. पण नियमित फिटनेस आणि गेम टाइमचा फिटनेस पूर्णपणे वेगळा असतो“ “तुम्ही नियमित क्रिकेट खेळत नसाल, तर गेम टाइम सुनिश्चित करावं लागेल. त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल“ असं इरफान पठाण म्हणाला. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा फायनल सामना दोघांचा शेवटचा सामना होता. 9 मार्च 2025 रोजी दोघे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले आहेत.
त्यांना माहित आहे काय करायचं?
‘दोघेही मोठे खेळाडू आहेत, त्यांना माहित आहे काय करायचं?’ असं इरफान पठाण पुढे म्हणाला. “त्यांच्याकडे बराच अनुभव आहे. पण ते टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीयत. अशावेळी थेट वर्ल्डकपमध्ये खेळल्यास क्रिकेटमध्ये मोठा गॅप राहिलं. म्हणून त्यांनी नियमित खेळलं पाहिजे. तेव्हाच 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याच त्यांचं स्वप्न साकार होईल“ असं इरफान पठाण म्हणाला. त्याने शुबमन गिलच कौतुक केलं. त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे, त्याला चांगल्या पद्धतीने जबाबदारी निभवावी लागेल असं इरफान म्हणाला.
