टीम इंडियाचं जगाने कौतुक केलं, आता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात….

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोहली ब्रिगेडचं कौतुक केलं. त्यात आता पाकिस्तानचा नंबर लागला आहे. देशाच्या सीमेपलिकडून भारतीय संघाला शुभेच्छा आल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान […]

टीम इंडियाचं जगाने कौतुक केलं, आता पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात....
Follow us on

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात जिंकलेल्या कसोटी मालिकेनंतर भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोहली ब्रिगेडचं कौतुक केलं. त्यात आता पाकिस्तानचा नंबर लागला आहे. देशाच्या सीमेपलिकडून भारतीय संघाला शुभेच्छा आल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान आणि माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी विराट कोहलीच्या टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

इम्रान खान यांनी ट्विट करुन विराट कोहली आणि भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

विराट कोहली आणि भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकून, आशिया खंडातील पहिला विजयी संघ ठरल्याबद्दल अभिनंदन, असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मदतीला पाऊस धावल्यामुळे त्यांचा डावाने पराभव टळला. चौथा कसोटी सामना ड्रॉ राहिल्यामुळे भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली.

स्वातंत्र्यानंतर पहिला विजय, भारताची ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात

भारताच्या या विजयाबद्दलच इम्रान खान यांनी अभिनंदन केलं. इम्रान खान यांनी पाकिस्तानला 1992 सालचा वन डे विश्वचषक जिंकून दिला होता. एकेकाळचे सर्वोत्त अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख आहे. इम्रान खान सध्या पाकिस्तानच्या राजकारणात सक्रीय आहेत. ते सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत.

दुसरीकडे शोएब अख्तरनेही ट्विटरद्वारे आपल्या शुभेच्छा दिल्या. ऑस्ट्रेलिया दौरा अत्यंत खडतर असतो, मात्र भारताने संपूर्ण मालिकेत आपला दबदाब राखला, असं शोएबने म्हटलं.

अख्तर म्हणतो, “टीम  इंडियाचं ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाबद्दल अभिनंदन. क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका सर्वात खडतर असते. भारताने ऑस्ट्रेलियावर दबदबा कायम राखला”

संबंधित बातम्या 

VIDEO : ‘मेरे देश की धरती’ गाण्यावर भारतीय संघाचा डान्स  

मित्रांनो, आता अलार्म बंद करा, बिनधास्त झोपा : विराट कोहली  

स्वातंत्र्यानंतर पहिला विजय, भारताची ऑस्ट्रेलियावर 2-1 ने मात