IND VS AUS | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, स्टार्कच्या बोलिंगवर दुखापत, रक्त आलं तरी विराट खेळतच राहिला!

| Updated on: Dec 17, 2020 | 9:17 PM

विराटला स्टार्कच्या बोलिंगवर दुखापत झाली, प्रसंगी रक्त निघालं पण विराटने मैदान सोडलं नाही.

IND VS AUS | विषय गंभीर पण भाऊ खंबीर, स्टार्कच्या बोलिंगवर दुखापत, रक्त आलं तरी विराट खेळतच राहिला!
Follow us on

अ‌ॅडलेड :  अ‌ॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर आजपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन बोलर्स भारतीय बॅट्समनवर भारी पडले. अशातही कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपला फॉर्म पुन्हा एकदा दाखवून दिला. दरम्यान, या मॅचमध्ये विराटला स्टार्कच्या बोलिंगवर दुखापत झाली, प्रसंगी रक्त निघालं पण विराटने मैदान सोडलं नाही. (IND VS AUS Virat kohli injury mitchell Starc Ball Adelaide Test)

स्टार्कच्या बोलिंगवर विराट कोहलीला दुखापत झाली. डावाच्या 43 व्या ओव्हरमध्ये कोहलीच्या अंगठ्याला बॉल लागला. स्टार्कचा शॉर्ट पिच बॉल कोहलीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लागला. तो इतका जोरदारपणे लागला की कोहली खूप वेळ वेदनेने हात हलवत होता.

कोहलीने ग्लोव्ह्ज काढल्यानंतर त्याच्या अंगठ्यातून रक्त येत असल्याचं दिसलं. अशात काही वेळ खेळ थांबवला गेला. टीम इंडियाचे फिजीओ तात्काळ मैदानात आले. कोहलीच्या अंगठ्यावर उपचार केले तसंच बँडेज बांधलं. यानंतर खेळाला सुरुवात झाली.

बॉल लागल्यानंतर कोहलीला नशिबाने साथ दिली. एका बॉलवर चुकीचा फटका खेळल्यावर बॉल फिल्डरच्या हातात स्थिरावला नाही. नंतर कोहली 74 रन्सवर रनआऊट झाला. अजिंक्य रहाणेसोबत रन्स घेताना गडगड होऊन कोहली रनआऊट झाला. आऊट होण्याअगोदर विराटने चेतेश्वर पुजारासोबत 68 रन्सची तर रहाणेसोबत 88 रन्सची पार्टनरशीप केली. याअगोदर भारताच्या पहिल्या तीन विकेट्स लवकर पडल्या.

याअगोदर टॉस जिंकून भारताने पहिल्यांदा पहिल्यांदा बँटिंग करण्याचा निर्णय घेतला. सलमीचा फलंदाज पृथ्वी शॉ पहिल्याच ओव्हरमध्ये भोपळाही न फोडता आऊट झाला. मयांक अग्रवालने क्रिजवर टिकण्याचा प्रयत्न केला परंतु पॅट कमिन्सच्या बोलिंगवर तो क्लिन बोल्ड झाला. अशआ परिस्थितीत पुजाराने एक बाजू लावून धरली. पुजारा, रहाणे आणि विराटने ऑस्ट्रेलियन बोलर्सचा चांगला सामना केला.

दरम्यान, टीम इंडियाने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 विकेट गमावून 233 धावा केल्या.  दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋद्धीमान साहा नाबाद 9 तर रवीचंद्रन आश्विन नाबाद 15 धावांवर खेळत होते.

(IND VS AUS Virat kohli injury mitchell Starc Ball Adelaide Test)

संबंधित बातम्या

Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?

Australia vs India, 1st Test, Day 1 : विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ झिरोवर बोल्ड, चाहत्यांनी सोशल मीडियावर झोडपलं