Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?

ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीत पृथ्वी शून्यावर बाद झाला.

Prithvi Shaw | मुंबईकर पृथ्वी शॉला कशाची दृष्ट लागली ?
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 6:48 PM

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया  (India vs Australia 2020-21) यांच्यात आजपासून (17 डिसेंबर) पहिल्या  कसोटी सामन्याला सुरुवात झाली. सलामीसाठी मयंक अग्रवाल आणि मुंबईकर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) मैदानात आले. पृथ्वीने पहिला चेंडू बीट केला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर मिचेल स्टार्कने पृथ्वीची दांडी गुल केली. पृथ्वी शून्यावर बाद झाल्याने त्याला दिवसभर ट्रोल करण्यात आले. इतकं ट्रोल केलं की पृथ्वी ट्विटरवर ट्रेंड झाला. पृथ्वी आयपीएलच्या 13 व्या मोसमापासून सातत्याने चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरतोय. यामुळे पृथ्वीच्या कामगिरीला कोणाची दृष्ट लागली, असा प्रश्न पृथ्वीच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे. big achievements in mumbaikar prithvi shaw cricket career

पृथ्वी गेल्या काही महिन्यांपासून निराशाजनक कामगिरी करतोय. मात्र त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. पृथ्वी पहिल्यांदा प्रकाशझोतात आला तो हॅरीस शिल्ड या शालेय स्पर्धेमुळे. ही स्पर्धा शालेय स्तरावरची होती. मात्र या स्पर्धेमुळेच पृथ्वीला घरोघरी ओळख मिळाली. पृथ्वीने या स्पर्धेत रिझवी स्प्रिंगफील्ड संघातर्फे खेळताना 546 धावांची खेळी केली. पृथ्वीने वयाच्या 14 व्या वर्षी ही कामगिरी केली. या खेळीसाठी त्याचे अनेक दिग्गज खेळाडूंकडून कौतुक करण्यात आले. यानंतर पृथ्वीने मागे वळून पाहिलं नाही.

2016 मध्ये मुंबई अंडर – 16 संघाच्या नेतृत्वाची संधी

पृथ्वीला 2016 मध्ये मुंबई अंडर – 16 संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली. पृथ्वीने या संधीचं सोनं केलं. शाळेय आणि अंडर 16 टीमसाठी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रवेश मिळाला. पृथ्वीने रणजी करंडकात संधी मिळाली. पृथ्वीनं तामिळनाडूविरोधात पदार्पण केलं. या सामन्यात त्याने शतक झळकावलं.

अंडर 19 वर्ल्ड कप

आता त्याची जशी निराशाजनक कामगिरी सुरु आहे. मात्र करियरच्या सुरुवातीला त्याच्या कामगिरीचा आलेख हा चढता होता. दिवसेंदिवस पृथ्वी धमाकेदार खेळी करत होता. पृथ्वीला अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. पृथ्वीने या संधीचंही सोनं केलं. पृथ्वीने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला अंडर 19 वर्ल्ड कप जिंकवून दिला.

आयपीएलमध्ये 2018 मध्ये खेळण्याची संधी

पृथ्वीला आयपीएलमध्ये 2018 मध्ये खेळण्याची संधी मिळाली. दिल्लीने पृथ्वीला आपल्या ताफ्यात समाविष्ठ करुन घेतलं. या पहिल्याच वर्षी त्याने अर्धशतक लगावण्याची कामगिरी केली. तेव्हा पृथ्वी आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक लगावणारा फलंदाज ठरला. दरम्यान नंतर हा विक्रम रियान परागने मोडीत काढला.

पदार्पणातील कसोटीत शतक

पृथ्वीला ऑक्टोबर 2018 मध्ये कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. या पदार्पणाच्या सामन्यात त्याने शतक ठोकलं. त्याने एकूण 134 धावा केल्या. दिवसेंदिवस पृथ्वी दमदार कामगिरी करत होता.

पृथ्वीची गेल्या काही वर्षातील कामगिरी पाहता आताच्या आणि तेव्हाच्या पृथ्वीत फार अंतर आहे. मात्र पृथ्वीला लवकरात लवकर सुर गवसावा, अशा शुभेच्छा त्याच्या चाहत्याकडून देण्यात येत आहेत. यामुळे लवकरच पृथ्वीकडून ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत चांगली कामगिरी पाहायला मिळेल, अशी आशा व्यक्त करुयात.

संबंधित बातम्या : 

Prithvi Shaw | पृथ्वी शॉ झिरोवर बोल्ड, चाहत्यांनी सोशल मीडियावर झोडपलं

Australia vs India, 1st Test, Day 1 : विराटची झुंजार खेळी, पहिल्या दिवसाखेर टीम इंडियाच्या 6 बाद 233 धावा

big achievements in mumbaikar prithvi shaw cricket career

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.