AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकने बाजी पलटली, प्रिन्स यादवला दूत बनवून मैदानात पाठवलं आणि सगळी मॅच भारताच्या बाजूने फिरली

IND vs ENG : आयर्लंड पाठोपाठ इंग्लंडमध्ये टी20 सीरीजमध्ये पराभव झाल्याने टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर सर्वांच्या रडारवर आहे. त्यांच्यावर बरीच टीका सुरु आहे. पण आता पहिल्या वनडे सामन्यात गौतम गंभीर यांनी आपली अचूक रणनिती दाखवून दिली आहे.

IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकने बाजी पलटली, प्रिन्स यादवला दूत बनवून मैदानात पाठवलं आणि सगळी मॅच भारताच्या बाजूने फिरली
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Jul 15, 2026 | 8:57 AM
Share

इंग्लंड दौऱ्यावर अखेर भारताला पहिला विजय मिळाला आहे. भारताने पहिला वनडे सामना 6 विकेटने जिंकला. भारताच्या विजयात शुबमन गिल महत्वाची इनिंग खेळला. गिलने 80 रन्स केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची इनिंग सुद्धा महत्वाची ठरली. त्यामुळे भारताला पहिला वनडे सामना सहज जिंकता आला. अक्षर पटेलला त्याच्या इनिंगसाठी प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सामन्यात इंग्लंडचा डाव सुरु असताना एक गोष्ट घडली. त्याने विजयाचा पाया रचला. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रूकसाठी हेड कोच गौतम गंभीर यांनी अचूक प्लान बनवलेला. त्याचा फायदा भारतीय संघाला झाला. हॅरी ब्रूक क्रीजवर आल्यानंतर गौतम गंभीरने प्रिन्स यादव मार्फत जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणण्याचा मेसेज पाठवला.

बरोबर, पुढच्याच ओव्हरमध्ये शुबमन गिलने बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर भारताला विकेट मिळाला. या एकाविकेटमुळे इंग्लंडची टीम पूर्णपणे बॅकफूटवर ढकलली गेली. पुन्हा एकदा गौतम गंभीरच्या अचूक रणनितीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. गौतम गंभीरच्या या मास्टर स्ट्रोकचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक होतय. या मॅचमध्ये अक्षर पटेलच्या ऑल राऊंडर परफॉर्मन्समुळे भारताला विजय मिळवला. अक्षरने घेतलेल्या चार विकेटमुळे इंग्लंडचा डाव 258 धावांवर आटोपला. त्यानंतर 52 चेंडूत 57 धावा करुन विजयी लक्ष्य गाठण्यात अक्षरने महत्वपूर्ण योगदान दिलं. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरने 52 धावा केल्या.

एकवेळ भारताची स्थिती 4 बाद 160 धावा होती

भारताला विजयासाठी 259 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताने 45.2 ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून 262 धावा करुन हा सामना जिंकला. एकवेळ भारताची स्थिती 4 बाद 160 धावा होती. त्यानंतर अक्षर आणि वॉशिंग्टनने पाचव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी करुन भारताला सोपा विजय मिळवून दिला. गिल शानदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने 75 चेंडूत 80 धावा करताना 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला होता.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप