AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना काल पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर कर्णधार शुभमन गिलने एक विधान केले त्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?
shubman gill
| Updated on: Jul 15, 2026 | 8:18 AM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर, पाहुण्या भारतीय संघाने अखेर या दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतल्यानंतर, 258 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शुभमन गिल (80), वॉशिंग्टन सुंदर (52 नाबाद) आणि अक्षर पटेल (57 नाबाद) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताने 45.2 षटकांतच हे लक्ष्य गाठले.

भारतीय कर्णधार शुभमन गिल सामना जिंकल्यानंतर म्हणाला, “खरं सांगायचं तर, हे आमच्या संघाच्या संयोजनामुळे झालं. आमची गोलंदाज अजून थोडे नवीन आहेत, त्यामुळे आमची फलंदाजी अजूनही आमच्या गोलंदाजीपेक्षा अधिक अनुभवी आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात, आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, जेणेकरून 320 धावांचे लक्ष्य दिले तरी ते आम्ही गाठू असा आमच्या फलंदाजीवर पूर्ण विश्वास होता.” गिलने सामना जिंकल्यानंतरही गोलंदाजांना एक टोमणा मारला असे पाहायला मिळत आहे.

गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे, विशेषतः मधल्या षटकांमध्ये केलेल्या पुनरागमनाचे कौतुक करताना कर्णधार गिल म्हणाला, “मला वाटते की आम्ही मधल्या षटकांमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती पाहण्यासारखी होती. पहिल्या 10 षटकांत इंग्लंडच्या संघाने 50 धावाच केल्या होत्या. आम्ही पहिल्या 6-7 षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, जिथे खेळपट्टीने थोडी मदत केली आणि आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली. पॉवरप्लेच्या शेवटी त्यांनी थोडी आक्रमक फलंदाजी सुरू केली, ज्यामुळे आमच्यावर दबाव आला. पण ज्या प्रकारे आम्ही पुनरागमन केले आणि पाच बळी घेतले, ते आमच्यासाठी महत्त्वाचे होते.”

मधल्या खालच्या फळीच्या कामगिरीने आनंदित झालेल्या गिलने सांगितले, “जेव्हा तुम्ही तुमच्या मधल्या आणि खालच्या फळीला अशा धावा करताना आणि संघासाठी सामने जिंकून देताना पाहता, तेव्हा एक कर्णधार आणि अव्वल फळीतील फलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. 2027 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, दक्षिण आफ्रिकेसारख्या परिस्थितीसाठी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी संघ वेगवेगळ्या संयोजनांचे प्रयोग करत आहे.”

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?