AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : श्री कृष्ण जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्ट रोजी होणार

| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 6:00 PM
Share

Maharashtra News LIVE Updates In Marathi : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला.

Maharashtra News LIVE : श्री कृष्ण जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्ट रोजी होणार
Maharashtra News

LIVE NEWS & UPDATES

  • 15 Jul 2026 06:00 PM (IST)

    गोरेगावमध्ये दुधात भेसळ करणाऱ्या 2 जणांना अटक

    नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात मुंबई गुन्हे शाखेनी मोठी कारवाई केली आहे. गोरेगावमध्ये नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 99, कांदिवली युनिटला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे गोरेगाव पूर्व, प्रेम नगर, तीन डोंगरी येथील अंकुर बिल्डींग जवळ छापा टाकण्यात आला आहे.

  • 15 Jul 2026 05:29 PM (IST)

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीमध्ये दाखल झाला आहे बारामती मधील शारदा प्रांगण येथे आज श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा मुक्कामी असणार आहे. बारामतीत पालखी सोहळा दाखल होताच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

  • 15 Jul 2026 05:23 PM (IST)

    मुसळधार पावसात दिवा भिवंडी खाडीमधील तात्पुरत्या स्वरूपातील पूल गेला वाहून

    जुलै महिन्यातील पावसाचा फटका अनेक शहर आणि बांधकामाना बसला होता. तर दुसरीकडे पावसामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला मोठा धक्का बसला आहे. दिवा आणि भिवंडीदरम्यान खाडी पात्रात मुख्य रेल्वे पूल उभारण्यासाठी बांधण्यात आलेला तात्पुरता लोखंडी पुलाचा काही भाग पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला आहे.

  • 15 Jul 2026 05:15 PM (IST)

    केज शहरासह परिसरात दमदार पावसाला सुरुवात

    बीडच्या केज शहरासह परिसरात गेल्या दोन तासांपासून दमदार पाऊस सुरू आहे. या पावसाने केज शहरातील रस्ते जलमय झाले आहेत, तर काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, मात्र अजूनही बीड जिल्ह्यातील मोठा भाग दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

  • 15 Jul 2026 04:54 PM (IST)

    अयोध्या: एडीएच्या नोटीसनंतर लवकुशची पत्नी हजर

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणातील आरोपी लवकुश मिश्रा यांच्या घरावर एडीएने नोटीस बजावल्यानंतर, सुप्रिया मिश्रा यांनी आज आपल्या मुली आणि वडिलांसह अयोध्या विकास प्राधिकरणाच्या (एडीए) कार्यालयाला भेट दिली. त्यांनी बांधकाम सुरू असलेल्या घराशी संबंधित अपूर्ण कागदपत्रांबाबत प्राधिकरणाकडे एक याचिका सादर केली.

  • 15 Jul 2026 04:37 PM (IST)

    मदन मित्रा यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा राजीनामा दिला, बंडखोर गटात सामील

    पश्चिम बंगालमध्ये मदन मित्रा यांनी तृणमूल काँग्रेस (ममता बॅनर्जी) पक्षातून राजीनामा दिला आहे. ते आता ऋतब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर तृणमूल काँग्रेस (टीएमसी) गटात सामील झाले आहेत.

  • 15 Jul 2026 04:18 PM (IST)

    श्री कृष्ण जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 12 ऑगस्ट रोजी होणार

    मथुरा श्री कृष्ण जन्मभूमी विवाद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याची सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मुस्लिम पक्षाच्या याचिकांमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या त्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे, ज्यामध्ये हिंदू पक्षाने दाखल केलेले प्रकरण सुनावणीसाठी योग्य मानले होते.

  • 15 Jul 2026 04:10 PM (IST)

    वांगचुक यांच्या उपोषणाच्या याचिकेवर उच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार

    जंतर मंतरवर अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या जनहित याचिकेवर उद्या (गुरुवारी) सुनावणी होईल, असे दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी सांगितले.

  • 15 Jul 2026 03:54 PM (IST)

    पुणे : 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या क्लास चालकाला नागरिकांनी चोपले

    14 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या क्लास चालकाला नागरिकांनी चोप दिला आहे. अल्पवयीन मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणाऱ्या खाजगी क्लास चालकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील आंबेगाव पठार पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरिफ सय्यद अस क्लास चालकाचे नाव असून, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

  • 15 Jul 2026 03:40 PM (IST)

    सातारा : नीरा नदीच्या तीरावर माऊलींच्या पादुकांचे स्नान

    संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे. या दरम्यान नीरा नदीमध्ये दत्त घाटावर माऊलीच्या पादुकांना स्नान घालण्यात आले हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो वारकरी भाविक नीरा नदीच्या तीरावर विसावले आहेत.

  • 15 Jul 2026 03:24 PM (IST)

    जळगाव : चाळीसगाव तालुक्यात पावसाची ओढ; मन्याड धरणात केवळ 20 टक्के जलसाठा

    जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तालुक्यातील अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प कोरडे पडले असून, सर्वाधिक चिंता वाढवणारी बाब म्हणजे तालुक्यातील सर्वात मोठ्या मन्याड धरणात केवळ 20 टक्के जलसाठा शिल्लक आहे. या धरणावर तब्बल 22 गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे. जुलै महिना अर्धा संपत आला तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने अद्याप धरणात पाण्याची आवक सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली असून, आता सर्वांच्या नजरा वरुणराजाकडे लागल्या आहेत.

  • 15 Jul 2026 03:10 PM (IST)

    शेतकऱ्यांचे थकित वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची घोषणा

    शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी 48 हजार कोटींचे वीजबील माफ करण्याची घोषणा केली आहे. तुमच्या सगळ्यांच्या नावावर 7.5 हॉर्स पावरची जुनं बिलं आहेत. प्रत्येकाच्या नावाने तुमची जुने बिलं आहेत, कधीही कंपनीचा कर्मचारी वसूलीसाठी येऊ शकतो. मात्र आता आम्ही 48 हजार कोटींचे जुने बिल माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे यासाठी हा निर्णय घेतोय असं फडणवीसांनी सांगितले.

  • 15 Jul 2026 02:55 PM (IST)

    कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने आंदोलन

    कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने आंदोलन. माजी खासदार विनायक राऊत, त्यांच्या कुटुंबीयांसह संबंधित भोंदू बाबांविरोधात तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी शिंदे शिवसेना महिला सेनेकडून आंदोलन

  • 15 Jul 2026 02:45 PM (IST)

    भिसे खिंड ठरतेय मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजनांची मागणी

    नागोठणे आणि रोहा या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी भिसे खिंड आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. मुसळधार पावसानंतर या मार्गावर वारंवार मातीचा ढिगारा, दगड आणि दरडी कोसळत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेमुळे हा मार्ग तब्बल दहा तास बंद राहिला होता. या मार्गावरून ३० हून अधिक गावांचा रोहा तालुक्याशी संपर्क राहतो. त्यामुळे रस्ता बंद झाल्यास नागरिकांना मोठा फटका बसतो. संभाव्य मोठी दुर्घटना टाळण्यासाठी भिसे खिंडीत कायमस्वरूपी संरक्षणात्मक उपाययोजना करून दरडप्रवण भाग सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

  • 15 Jul 2026 02:30 PM (IST)

    मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटने प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गट आक्रमक

    मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटने प्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गट आज चांगलाच आक्रमक झाला.महापालिकेच्या गेट वर कचरा टाकत शिवसेनेने आज आंदोलन केले.या वेळी अधिकारी काढून घेण्यात आलेले पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांच्या प्रतिमेवर कचरा टाकत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. कुलकर्णी यांच्या प्रतिमेला पैशांचा हार घालत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले.संजय कुलकर्णी आणि अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या वेळी करण्यात आली…

  • 15 Jul 2026 02:24 PM (IST)

    कोस्टल रोडवरील बोगद्यात जळालेले वाहन हटवण्यात वाहतूक विभागाला यश

    कोस्टल रोडवरील बोगद्यात जळालेले वाहन हटवण्यात वाहतूक विभागाला यश वाहतूक पूर्ववत. मुंबईतील कोस्टल रोडच्या साऊथ बाऊंड सीपी-५ परिसरातील बोगद्यात जळालेल्या वाहनाला अग्निशमन दलाने तातडीने आग विझवून परिस्थिती नियंत्रणात आणली. क्रेनच्या मदतीने जळालेले वाहन बोगद्याबाहेर सुरक्षितपणे हटविण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर साऊथ बाऊंड आणि नॉर्थ बाऊंड या दोन्ही दिशांवरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू असून सध्या कोस्टल रोडवरील वाहतूक सामान्यपणे सुरू असल्याची माहिती

  • 15 Jul 2026 01:55 PM (IST)

    गुंडगिरीच्या विरोधात पंचायत समिती कार्यालयावर गावकऱ्यांचा मोर्चा

    बीडच्या पाटोदा तालुक्यातील येवलवाडी सडक्याची येथे शेकडो विहिरी, गायगोठे बोगस झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. लवकरात-लवकर कार्यवाही करावी आणि दोषींवर कारवाई करावी. तसेच गावातील गुंडगिरी थांबवावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाटोदा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. तर तक्रार केल्याने धमकावले जात असुन दबाव आणला जातो असा आरोप तक्रारदाराने केला आहे.

  • 15 Jul 2026 01:40 PM (IST)

    देहू ते पंढरपूरपर्यंत स्वच्छता करून तुकोबांच्या पालखीत सेवाभाव

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा देहू ते पंढरपूर मार्गस्थ झाला. पालखी सोहळ्यात अनेक वारकरी नागरिक वेगवेगळ्या सेवाभावी व्यक्त करतात करताना दिसत आहेत. तुकोबांच्या पालखीत घेऊ ते पंढरपूर पर्यंत स्वच्छता करून श्री संत गाडगे महाराज यांचा आरोग्याचा संदेश देण्याचा माझा प्रमुख उद्देश असल्याचं फुलचंद नागटिळक यांनी सांगितलं.

  • 15 Jul 2026 01:28 PM (IST)

    कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे वाहतूक कोंडी

    कोस्टल रोडवर कारला झालेलेया अपघातामुळे पेडर रोड आणि भुलाभाई देसाई रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. तीन किलोमिटरपर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

  • 15 Jul 2026 01:08 PM (IST)

    शासकीय वाळू ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

    पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील शासकीय वाळू ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पाच लाख रुपयांच्या खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचा राग मनात धरून तुषार उर्फ बालाजी नागटिळक आणि त्याच्या साथीदारांनी बबन सोपान माने यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • 15 Jul 2026 12:50 PM (IST)

    अग्निशमन दल आता कोस्टल रोड बोगद्यात दाखल

    अग्निशमन दल आता कोस्टल रोड बोगद्यात दाखल. हजीअलीकडे वाहतूक वळवायला आता सुरुवात झाली आहे. कोस्टल रोडचे दोन्ही बोगदे बंद झाले आहेत असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे.

  • 15 Jul 2026 12:40 PM (IST)

    मुंबईतील कोस्टल रोडवर एका कारला आग

    मुंबईतील कोस्टल रोडवर एका कारला आग लागल्याने इतर लोकांच्या गाड्या अडकून बसल्या आहेत. शेकडो गाड्या अडकून पडल्या आहे. सध्या या ठिकाणची नरिमन पॉईंटकडून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या पोलिस प्रशासन तिथे पोहोचले आहेत.

  • 15 Jul 2026 12:35 PM (IST)

    मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात

    मुंबईतील कोस्टल रोडवर अपघात. गाड्यांची एकमेकांना धडक, नरीमन पॉइंटकडून  कोस्टल रोडची वाहतूक थांबवली, कोस्टल रोडच्या आत आग लागली आहे.

  • 15 Jul 2026 12:30 PM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार सोहळा

    कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार सोहळा आयोजित.

  • 15 Jul 2026 12:20 PM (IST)

    डिलिमिटेशनवर सुप्रिया सुळेंची भूमिका काय?

    मला डिलिमिटेशनचा प्रॉसेस काय असेल फॉर्म्युला काय असेल ते तर माहित हवं ना, नवं विधायक आलं की त्यावर आम्ही चर्चा करु.

  • 15 Jul 2026 12:10 PM (IST)

    डिलिमिटेशनवर सुप्रिया सुळेंने दिली प्रतिक्रिया

    मी राऊत आणि सपकाळांसोबत चर्चा केली आहे. डिलिमिटेशनचे नवे विधायक आल्यावर भूमिका जाहीर करु, महिला विधेयक आधीच मंजूर झाले आहे.

  • 15 Jul 2026 12:00 PM (IST)

    राष्ट्रवादी NDA सोबत जाणार का? सुप्रिया सुळेंने दिली प्रतिक्रिया

    पक्षाने कोणत्याही प्रकारची अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चा केवळ सुत्रांच्या माहितीवर.

  • 15 Jul 2026 11:56 AM (IST)

    श्रीगोंद्यातून संत शेख महंमद महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना

    श्रीगोंद्यातून संत शेख महंमद महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या दिंडीचे यंदाचे तिसरे वर्ष. संत शेख महंमद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन सुफी संत.सुमारे दोन हजार वारकऱ्यांचा दिंडीत उत्स्फूर्त सहभाग. धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्याचा दिला अनोखा संदेश. राज्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यातून बंधुभावाचा आदर्श.

  • 15 Jul 2026 11:46 AM (IST)

    सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी अडचणीत

    लातूर जिल्ह्यातला सोयाबीन आणि ऊस उत्पादक शेतकरी पावसाअभावी अडचणीत आला आहे. विहीर आणि बोअरवेलची पाणी पातळी झपाट्याने खालावली असल्याने शेतकऱ्यांना पिकं वाचवणं अशक्य झालं आहे. लातूर जिल्ह्यात 60 टक्के पेरण्या रखडलेल्या आहेत, मात्र ज्यांनी पावसाच्या आशेवर पेरणी केली आहे, त्यांची पिके करपू लागली आहेत.

  • 15 Jul 2026 11:29 AM (IST)

    आमच्या पक्षात आम्ही सर्व एकत्र आहोत – जयंत पाटील

    आमच्या पक्षात आम्ही सर्व एकत्र आहोत. रेवती सुळेंच्या लग्नावेळी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी पाच मिनिटं बोललं होतो. अर्थमंत्रीपदाबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील असं जयंत पाटील म्हणाले.

  • 15 Jul 2026 11:24 AM (IST)

    प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कधी भेट झाली नाही – जयंत पाटील

    एकतर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कधी भेट झाली नाही. त्यात कोणताही विलिनीकरण चर्चा होण्याचा प्रश्नच नाही. अजितदादांच्या निधनानंतर कोणाबरोबर अशी चर्चा झाली नाही. त्यामुळे ती थांबलीय असं शब्द वापरण्याची गरज नाही असं जयंत पाटील म्हणाले.

  • 15 Jul 2026 11:22 AM (IST)

    ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो – जयंत पाटील

    देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नियोजित भेट होती. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट होती असं जयंत पाटील यांनी सांगितलं. कारण जयंत पाटील जेव्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले, त्यावेळी तिथे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल तिथे होते.

  • 15 Jul 2026 11:13 AM (IST)

    दूध भेसळ प्रकरणातील आरोपीचं पोलिसांना ओपन चॅलेंज

    भूम दुध भेसळ प्रकरणातील आरोपींचे पोलिसांना ओपन चॅलेंज. रात्री गावात येऊन करतो दूध संकलन. गावामध्ये गाडीतून फिरतानाचा फोटो आला समोर. महिना एक लाख रुपयांची दूध भेसळ पावडर खरेदी करणाऱ्या आरोपीचा गावामध्ये खुलेआम वावर. रात्री अंधारात गावात येऊन दूध संकलन करीत असल्याची माहिती. गेल्या दोन वर्षात आरोपी काकासाहेब डोंबाळेने दूध भेसळीचा धंदा करून कमावली कोट्यवधीची मालमत्ता. दररोज जवळपास 3 हजार लिटर भेसळयुक्त दुधाचा करायचा पुरवठा. दूध भेसळ प्रकरणातील मुख्य आरोपी बाळासाहेब गोडगेच्या मधुबन ट्रेडिंग कंपनीकडून करीत होता पावडरची खरेदी. गुन्हा दाखल होऊन आठ दिवस झाले. पोलिस आरोपींच्या शोधात. मात्र आरोपी काकासाहेब डोंबाळेचे पोलिसांना चॅलेंज. गावात खुलेआम वावर.

  • 15 Jul 2026 10:57 AM (IST)

    जालना जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या जवळपास 61 तक्रारी

    जालना जिल्ह्यात मागच्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने पिकं धोक्यात येण्याच्या मार्गावर असताना दुसरीकडे मात्र शेतात पेरलेलं बियाणेच उगवत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. जालना जिल्ह्यात बियाणे न उगवल्याच्या जवळपास 61 तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सर्वाधिक 45 शेतकऱ्यांच्या तक्रारी शासनाच्या महाबीज कंपनीच्या आहेत. ज्या लॉटच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या ठिकाणची बियाणं तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचं जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शिवाय शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची दखल कृषी विभागाने घेतली असून आतापर्यंत 56 ठिकाणी जाऊन शेतात प्रत्यक्ष पाहणी करत पंचनामे केले असल्याचं जालना जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी स्पष्ट केलंय.

  • 15 Jul 2026 10:45 AM (IST)

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीत दाखल

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीत दाखल होत आहे. बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी येथील मुक्काम आटपून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बारामतीतील शारदा प्रांगण येथे मुक्कामी असणार आहे. आज बारामती पालखी सोहळा येणार असल्याने देशमुख चौकात ‘एवढाच निरोप सांगा माझ्या पांडुरंगाला, परत पाठवा देवा माझ्या विठ्ठलाला’, असे अजित पवार यांच्याबद्दल भावनिक बॅनर लागले आहेत.

  • 15 Jul 2026 10:29 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर पहाटे भीषण अपघात

    छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर पहाटे भीषण अपघात झाला. टोमॅटोने भरलेल्या पिकअपची ट्रकला समोरासमोर धडक झाली असून या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. रस्त्यावर टोमॅटोचा अक्षरशः लाल चिखल झाला असून तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

  • 15 Jul 2026 10:15 AM (IST)

    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचा महत्त्वाचा निर्णय

    आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद असेल. तुळशी पूजा, पाद्यपूजा आणि इतर विशेष पूजाही तात्पुरत्या बंद असतील. सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतून दर्शनाची सुविधा देण्यात येईल. व्हीआयपी दर्शन बंद झाल्याने सर्वसामान्य भाविकांचा दर्शनासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. आषाढी यात्रेदरम्यान गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे.

  • 15 Jul 2026 09:58 AM (IST)

    पनवेल जेएनपीटी मार्गावर गर्डर कोसळला, सुदैवाने कोणी जखमी नाही

    पनवेल जेएनपीटी मार्गावर  एका कारवर कोसळला गर्डर.  उड्डाणपूलाचे काम सुरू असताना हा गर्डर कोसळला अशी माहिती समोर आली आहे. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी नाहीझालं नाही.  जेएनपीटी वरून पनवेल येथे जाणाऱ्या मार्गीकेवरून जात असताना कार वर हा गार्डर कोसळून दुर्घटना झाली.

  • 15 Jul 2026 09:47 AM (IST)

    अहिल्यानगर – हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरण आज शहरात महामोर्चा

    श्रीरामपूर / अहिल्यानगर –  हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैया हत्या प्रकरणी आज होत असलेल्या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. बेमुदत शहर बंदचा आजचा चौथा दिवस असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महामोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

  • 15 Jul 2026 09:32 AM (IST)

    सीना नदीत पाणी सोडण्यापूर्वीच माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपाचे नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई

    सीना नदीत पाणी सोडण्यापूर्वीच माढ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजीत पाटील आणि भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे मध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. लोकप्रतिनिधींचे दावे-प्रतिदावे सुरु आहेत, मात्र नदीपात्र अजुनही कोरडेच आहेत.

    सीना नदीला उजनी धरणातून पाणी सुटण्याच्या अगोदरच माढ्यात नेत्यांकडून मात्र श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.  शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणी भाजपाचे नेते रणजितसिंह शिंदे या दोघा नेत्यांकडून सोशल वाॅर करीत आमच्याच पाठपुराव्याला यश आल्याचे दावे प्रतिदावे केले जात आहेत.

  • 15 Jul 2026 09:16 AM (IST)

    मुंबईत आज हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

    मुंबई –  आज सकाळपासूनच दाट ढगांनी आकाश व्यापले असून शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, आज दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहणार असून काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात.

  • 15 Jul 2026 09:09 AM (IST)

    जळगाव – घरातून एटीएम कार्डचोरून 29 हजारांची रक्कम लंपास

    जळगाव मधील गुरुनानक नगरात घरातून एटीएम कार्डचोरून 29 हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना उघड झाली आहे.  याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात मनोज चव्हाण उर्फ पापा तरुणाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पाय फ्रॅक्चर असलेल्या मनपा कर्मचाऱ्याला बघण्यासाठी आलेल्या शेजारच्या तरुणाने घरातून एटीएम कार्ड चोरून त्यातील पैसे काढून घेतल्याचे उघड झाले

  • 15 Jul 2026 08:55 AM (IST)

    नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर नाशिक मधील नगरसेवक आज ठाकरेंच्या भेटीला

    शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक फुटण्याच्या चर्चेनंतर नाशिकच्या नगरसेवकांची आज मातोश्रीवर बैठक. नाशिक मधील नगरसेवकांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचा आढावा घेत एकनिष्ठतेची खात्री केली जाणार. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः बोलवली नाशिक मधील 15 नगरसेवकांची बैठक.  बैठकीला नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या 15 नगरसेवकांपैकी किती नगरसेवक उपस्थित राहणार याकडे लक्ष

  • 15 Jul 2026 08:50 AM (IST)

    नवी मुंबई विमानतळावरून पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण

    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NMIA) आंतरराष्ट्रीय उड्डाणांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. एअर इंडिया एक्सप्रेसचे अबू धाबीला जाणारे विमान बुधवारी १५ जुलै पहाटे २:३० वाजता विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय सेवेचा औपचारिक शुभारंभ केला. देशांतर्गत सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर सुमारे २०० दिवसांनी, NMIA जागतिक हवाई नेटवर्कशी जोडले जाईल. एअर इंडिया एक्सप्रेस या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट विमानसेवा चालवेल, ज्यामुळे नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना UAE ला प्रवास करण्यासाठी एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.

  • 15 Jul 2026 08:40 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यातील 13 कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

    नियमभंगाविरोधात कृषी विभागाकडून करण्यात आली कठोर कारवाई  जिल्हात सुरू असलेल्या तपासणी मोहिमेदरम्यान कृषी सेवा केंद्रांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने करण्यात आली कारवाई.  भावफलक , साठाफलक e-POS साठ्यातील अनियमितता, ‘एम’ फॉर्ममधील देयके न देणे, शेतकऱ्यांच्या बिलावर स्वाक्षरी न घेणे यासारख्या आढळून आल्या त्रुटी.  एक एप्रिल पासून तर आत्तापर्यंत खते विक्रीचे 90 परवाने, बियाणे विक्रीचे 10 परवाने, कीटकनाशक विक्रीचे 12 परवाने असे एकूण 112 परवाने केले निलंबित

  • 15 Jul 2026 08:35 AM (IST)

    शहजाद भट्टी समर्थकांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

    एटीएसने ताब्यात घेतलेले काही संशयित लॉरेन्स बिश्नोई गँगचेही ‘फॉलोअर’ एटीएसच्या कसून चौकशीनंतर २१ पैकी १५ संशयितांची सुटका. उर्वरित संशयितांच्या डिजिटल डेटाची, तसेच आंतरराष्ट्रीय चॅटिंगची पडताळणी अद्याप सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या सोशल मीडिया खात्यांना समर्थन दिल्याप्रकरणी एटीएस कडून करण्यात आली होती कारवाई

  • 15 Jul 2026 08:30 AM (IST)

    परभणी जिल्ह्यात धक्कादायक प्रकार, थेट शालेय पोषण आहारात..

    परभणीच्या नऱ्हापूर येथे जिल्हापरिषद शाळेत दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात किडे,अळ्या आणि जाळे निघाल्याचा प्रकार उघड.हेच अन्न विद्यार्थ्यांना शिजवून दिलं जात असल्याचा शाळा समिती आणि गावाकऱ्यांचा आरोप. मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा गावाकऱ्यांची मागणी..

  • 15 Jul 2026 08:20 AM (IST)

    मुंबई गोवा महामार्गावर अपघात, लांजा रेस्ट हाऊस इथे हा अपघात

    अपघातात तीन जण जागीच ठार. पघातात दोन महिला एक मुलगा यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू. मुंबईच्या दिशेने जाणारा क्रेटा कारची डंपर ला मागून धडक. मुंबई आगरी पाडा येथे राहणाऱ्या हे कुटुंब गोव्यातून मुंबईला परत असताना झाला अपघात

  • 15 Jul 2026 08:16 AM (IST)

    बोगस बियाणे देत शेतकऱ्याची फसवणूक करणाऱ्या बियाणे कंपनीवर गुन्हा दाखल

    बाभुळगांव पोलिस ठाण्यात बुस्टर प्लॅन जेनेटिक्स कंपनीवर गुन्हा दाखल. बनावट व निकृष्ट दर्जाचा सोयाबीन बियाणे विक्री प्रकरणी बाभुळगांव पोलिसात कंपनीवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकारी च्या आदेशानंतर बाभुळगांव तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय तमलवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. बाभुळगांव पोलिसात कलम BSN 2023 च्या कलम 318(4) फसवणूक करणे,अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 बीज अधिनियम 1966 कलम 6(A) 7(B)19 आणि 21 अन्वये गुन्हा काल रात्री उशिरा दाखल

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. राज्यातील काही चेहऱ्यांना थेट संधी मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांचीही बैठक बोलावली. त्यांच्या पक्षातील सुनेत्रा पवार यांना आव्हान मिळाले. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध असल्याचे पत्रात म्हटले. थेट कायद्याचे उल्लंघन करून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचे म्हटले. वकिलांमार्फत हे पत्र पाठवण्यात आले. पक्षातील बंडखोरीच्या मुद्द्यात उद्धव ठाकरे अलर्ट मोडवर आहेत. त्यांनी आज नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांसोबत बैठक ठेवलीये. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याचे बघायला मिळाले. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने 12 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला.

Published On - Jul 15,2026 8:15 AM

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक