AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हातारा होशील पण ती मागणी कधीच मान्य होणार नाही, जरांगेंवर टीका, सदावर्ते यांनी पवारांचे नाव घेत केले मोठे विधान..

वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत मोठे विधान केले. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. फक्त टीकाच नाही तर त्यांनी जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट शब्दात सांगितले आहे.

म्हातारा होशील पण ती मागणी कधीच मान्य होणार नाही, जरांगेंवर टीका, सदावर्ते यांनी पवारांचे नाव घेत केले मोठे विधान..
Sharad Pawar Gunaratna Sadavarte
| Updated on: Aug 29, 2026 | 2:07 PM
Share

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, लोकशाहीमध्ये मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु धमकी देऊन नाही. मुंबई बॉम्बेला येऊन डिस्टर्ब करतो असे वक्तव्य करून जालना आणि संभाजीनगरमध्ये रास्ता रोको करून जनजीवन विस्कळीत करणे अश्यांना सामाजिक जीवनात मान्यता नाही. अंदर से कुछ और आणि बाहेर काही जरांगेच्या मागण्या संविधानाला धरून नाहीत. ते उघडे पडले आहे सावरासावर करत आहे. हौस मौज आणि व्यक्तिगत हे करत आहे. यांच्यामुळे मराठा भाऊंचा फायदा होत नाही. युवकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जाण्याच प्रयत्न केला आहे. पोलिसांना मारहाण झाली असेल रक्त निघालेले असेल तर भारताचा कोणता ही कायदा त्या केसेस मागे घ्यायची परवानगी देत नाहीत.

पुढे सदावर्ते यांनी म्हटले की, ज्या पद्धतीने आंतरवली सराटीमध्ये महिला पोलीसांवर हल्ला केला याला मुख्य आरोपी का केले नाही? जरांगेंची मागणी आहे पोलीस केसेस मागे घ्या. जरांगेंना सांगतो की, म्हातारा होशील हातात काठी येईपर्यंत ती मागणी मान्य होणार नाही. तुझे धनी एकनाथ शिंदे ही मागणी मान्य करू शकत नाहीत. युवकांना सांग घेऊन हे चुकीच्या मारगावे आणत आहेत.

या केसे मागे होऊ शकत नाही. दुसरी मागणी 58 लाख नोंदी… जनाची नाही तर मनाची लाज असावी. माजी न्यायमूर्ती शिंदे साहेब यांनी विचारले विखे साहेबांसमोर फोन काढून लावला. तुम्हाला माहिती रेतीच्या ठेकेदारांनी दिली आहे त्यांना काय कळत त्यांना माफ कळत. आमचे जे संशोधक मराठा भाऊ आहे, त्यांना विचारा. कोणाचे ऐकत नाही. पण तुझे माकड होत आहे, असेही सदावर्ते यांनी म्हटले.

तुझे वानर झाले, माणसाचे वानर होऊ नये. 58 लाख नोंदी 1800 पासून ते 1967 पर्यंतच्या आहेत. त्या नोंदीत कु आला म्हणजे आरक्षण येत नाही. त्यात 40 वेगवेगळ्या जाती आहेत. आजपासून लाडाने मन्या म्हणतो ये मन्या… हे वास्तव सत्य आहे, कोंकणात वेगळे कुणबी… तू नोंदीचे जप जपतो… जात प्रमाणपत्र जबरदस्ती करून मिळाले तरी वैलिडिटी होत नाही.

मराठाला एंट्री कर असे म्हणत आहे, पण तुला याचे नुकसान माहित आहे मन्या… आमच्या शेतीतील माणसाला सांगितले ना हे सगळे तरी ते सांगतील तू चुकत आहे. नोंदी ज्या सापडल्या आहे ती एकच नोंद अनेक वेळा आली आहे. जन्माची नोंद मृत्यूची नोंद शेत जमिनीची नोंद सात बाराची नोंद असे आहे. साडेसात टक्के आता मुस्लिम समाजातील लोक जात आहेत.

शरद पवार यांनी छातीवर हात ठेऊन सांगावे की एका वर्गाला तीन वेगळे आरक्षण मिळू शकतात का? एकीकडे EWS चे आरक्षण मागत आहे पुढे OBC चे मागत आहे.  मृत झालेल्या कुटुंबियांच्या व्यक्ती नोकरी द्या. घुलेचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना नोकरी नको. जर मराठा समाजातील लोकांना नोकरी देत आहात तर मग ज्या ज्या कुटुंबियांचे मृत्यू झाले आहे त्या त्या कुटुंबियातील लोकांना जात पात न पाहता नोकरी द्या.

कुटुंब कोणत्या ही जातीचे असले तरी ही नोकरी द्यावी लागेल. ज्या प्रकारे विखे पाटील भारतीय संविधानात सांगितले आहे की अधिकारी यांना बोलता येत नाही. तुम्ही अश्म्य गोष्ट केले आहे. अधिकाऱ्यांना शेतावर राबणाऱ्यांसाखी वागणूक दिली.  बैठक बोलावली त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. विखे पाटील ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांसोबत व्यक्त झाले, जात पडताळणीच्या अधिकाऱ्यांना विखे पाटलांनी कोणत्या अधिकारात बोलवले ? ते महसूल मंत्री आहेत का? मुख्यमंत्री आहे का? सामाजिक न्याय मंत्री शिरसाट होते का? कोणत्या अधिकाराने बोलावले.

प्रसाद लाड यांना ही सांगतो की, हे काय कंत्राट मिळविले आणि कसे ही वाटले असे नाही. मन्या मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत बोलला आहे. तुम्ही लाड किती दिवस लाड पुरविणार आहे. काल आम्ही तक्रार दिल्यानंतर 168 ची कारवाई पोलिसांनी केली आहे. जालनाचे अधीक्षक असो किंवा आझाद मैदान पोलिस मन्याला नोटीस बजाविण्यात आली. मन्याची मागणी गैर आहे चुकीची आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट