AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या… पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?

8th Pay Commission Update: 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक बैठका, विचार विनिमय, निवेदनं, वेतन बदल, फिटमेंट फॅक्टरसह इतर महत्त्वाची माहिती जाणून घ्या. पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांना असा होणार मोठा फायदा.

8th Pay Commission: हे 5 महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या... पेन्शनर्स आणि कर्मचाऱ्यांचा कसा होणार फायदा?
8 वा वेतन आयोग
| Updated on: Aug 29, 2026 | 1:58 PM
Share

8 व्या वेतन आयोगाची दोन दिवसांनी म्हणजे 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर येथे बैठक होणार आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सचा वेतन बदल, फिटमेंट फॅक्टर, पे मॅट्रिक्स आणि इतर महत्त्वाच्या घटकांचा परिणाम दिसून येईल. नवीन वेतन आयोग लागू होण्यासाठी मोठा कालावधी असला तरी कर्मचारी आणि पेन्शनर्सला या दरम्यान घडणाऱ्या अनेक घडामोडींची मोठी उत्सुकता लागलेली आहे. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील 8 व्या वेतन आयोगाच्या अधिकृत साईटवर तुम्हाला याविषयीचे अनेक अपेडट्स मिळतील.

वेतन आयोगाला 18 महिन्यांचा कालावधी

अधिकृत माहितीनुसार, 8 व्या वेतन आयोग नोव्हेंबर 2025 मध्ये तयार झाला. केंद्रीय कॅबिनेटने या आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. या आयोगाचे आतापर्यंत 10 महिन्यांचे कामकाज पूर्ण झाले आहे. आयोग मे ते जून 2027 या कालावधीत अंतिम अहवाल सादर करू शकतो. 29 ऑगस्टपर्यंत 8 व्या वेतन आयोगाविषयी लेटेस्ट अपडेट येऊ शकते.

8th Pay Commission Updates: 5 महत्त्वाचे अपडेट्स

8 व्या वेतन आयोगाच्या साईटवर नवीन अपडेट 24 ऑगस्ट 2026 रोजीचे आहे. त्यानुसार, 7-8 ऑक्टोबर 2026 रोजी बंगळुरू येथे बैठक होईल. त्यासाठी निवदेन देण्याविषयी आणि चर्चा करण्याविषयी अर्ज करण्याची तारीख 18 सप्टेंबर ही आहे. या बैठकीत कर्मचारी प्रतिनिधी, संघटना त्यांची बाजू आणि मतं आयोगासमोर मांडू शकतील.

11 ऑगस्ट 2026 रोजी 8 व्या वेतन आयोगाच्या कन्सल्टेंटनची नियुक्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक तत्व अपडेट करण्यात आली आहेत. त्यानुसार प्रोफेशनल आणि तांत्रिक बाजू अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.

3 ऑगस्ट 2026 रोजी 8 व्या वेतन आयोगाचा 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2026 रोजी जयपूर येथील दौऱ्यावर अपडेट देण्यात आली आहे. यामध्ये राजस्थानमधील विविध संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधी मंडळाशी आयोगाचे सदस्य चर्चा करतील.

24 जुले2026 रोजी आयोग 9 सप्टेंबर रोजी पुद्दुचेरी आणि 7–8 सप्टेंबर 2026 रोजी चेन्नई दौऱ्यावर जाणार आहे.

यापूर्वी आयोगाने दिल्ली, उत्तर प्रदेश, लद्दाख, पश्चिम बंगाल आणि ओडिशा सारख्या राज्यांचा दौरा केला आहे. या ठिकाणी आयोगाला काही सूचना करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला आहे. तर काही मागण्या समोर ठेवल्या आहेत.

कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी काय फायदा?

7th Pay Commission मध्ये 2.57 फिटमेंट फॅक्टर लागू करण्यात आला होता. त्यावेळी मूळ वेतन 7,000 रुपयांहून वाढून 18,000 रुपये असे करण्यात आले होते. अद्याप 8 व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरलेला नाही. अनेक कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.

महागाई भत्ता (DA/DR) वाढून 25% करावा अशी पेन्शनर्स असोसिएशनने मागणी केली आहे. डीए, डीआर मूळ वेतनात जमा करावा. यामुळे मूळ पेन्शनमध्ये, निवृत्ती वेतनात मोठी वाढ होईल. तर पुढे कर्मचारी, निवृत्तीधारकांना त्याचा फायदा होईल.

शिक्षक संघटनेच्या मुख्य मागणीत जुनी पेन्शन योजना (OPS) आणि अधिक सुट्यांसह पदोन्नतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

7 व्या वेतन आयोगाने वेतन निश्चित करताना 3 सदस्यीय कुटुंब ग्राह्य धरले होते. यामध्ये कर्मचारी, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश होता. पण आता ही सदस्यसंख्या पाच युनिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. आई-वडिलांचाही समावेश कुटुंबात करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याचे आई-वडीलच नाही तर सासू-सासऱ्यांचाही त्यात समावेश असावा. त्याच आधारे मूळ वेतन निश्चित करण्यात यावे.

Follow Us
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची...
राष्ट्रीवादीत मोठ्या हालचाली? कोअर कमितटीच्या बैठीकत रोहित पवारांची अनुपस्थिती, बड्या नेत्याने थेट...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर; नेमकं कारणही आलं समोर
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'