India Playing 11 5th Test : फायनल टेस्टसाठी टीम इंडियात 4 बदल का? पंत, बुमराह, अंशुल कंबोज, शार्दुलच्या जागी कोणाला सधी?
India Playing 11 5th Test : इंग्लंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात टीम इंडियात चार बदल होऊ शकतात. या दोन बदल इंजरीमुळे आहेत, तर अन्य दोन बदल वेळ आणि परिस्थितीची गरज आहे.

India Playing 11 in 5th Test : भारत आणि इंग्लंडमध्ये 5 सामन्यांच्या टेस्ट सीरीजमधील शेवटचा कसोटी सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. 31 जुलैपासून शेवटचा कसोटी सामना सुरु होईल. प्रश्न हा आहे की, या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? हा प्रश्न यासाठी आहे कारण इंजरीमुळे ऋषभ पंत बाहेर आहे. मेडीकल टीमने जसप्रीत बुमराहला पुढच्या टेस्टसाठी हिरवा झेंडा दाखवलेला नाही. म्हणजे इंग्लंड विरुद्ध पाचव्या टेस्टसाठी तो टीममध्ये नसेल. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हन काय असेल?.
टीम इंडियात 4 बदल होऊ शकतात. आता प्रश्न हा आहे की, ते चार बदल काय असतील?. दोन बदल ठरलेले आहेत, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह. पण अन्य दोन बदल कुठले?. रिपोर्टनुसार ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरैलच खेळणं निश्चित मानलं जात आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहला डेब्युची संधी मिळू शकते. असं झाल्यास टीम इंडियाकडून टेस्ट कॅप घालणारा तो 319 वा खेळाडू असेल.
आकाश दीप आल्यास बाहेर कोण जाणार?
आकाश दीपच टीममध्ये कमबॅक होऊ शकतं. आकाश दीप दुखापतीमुळे मँन्चेस्टरमध्ये चौथा कसोटी सामना खेळू शकला नव्हता. आकाश दीप टीममध्ये परतल्यास अंशुल कंबोजला टीमच्या बाहेर केलं जाऊ शकतं.
मुंबईचा खेळाडू बाहेर जाणार
ओव्हल टेस्टसाठी कुलदीप यादवचा सुद्धा टीममध्ये समावेश होऊ शकतो. असं यासाठी कारण तो नेट्समध्ये भरपूर मेहनत घेत आहे. प्रॅक्टिस सेशन दरम्यान हेड कोच गौतम गंभीर कुलदीप बरोबर बराचवेळ बोलले. कुलदीपचा टीममध्ये समावेश झाल्यास शार्दुल ठाकूरला बाहेर बसावं लागू शकतं. या चौघांशिवाय टीम इंडियात ते खेळाडू खेळताना दिसतील जे चौथ्या कसोटी सामन्यात होते.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
शुभमन गिल ( कर्णधार), यशस्वी जैसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरैल, रवींद्र जडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि अर्शदीप सिंह
