IND vs NZ : केएल राहुलची वेलिंगटनमध्ये ऐतिहासिक सेंच्युरी, दिग्गजांच्या क्लबमध्ये एन्ट्री मिळवताना रेकॉर्ड बुकमध्ये सोनेरी अक्षरात नोंदवलं नाव
IND vs NZ 1st Test : वेलिंगटन कसोटीत संघाला गरज असताना ओपनर केएल राहुलची बॅट तळपली. राहुलने ऐतिहासिक शतकी खेळी केली. राहुलने न्यूझीलंडमध्ये एक नवीन सोनेरी अध्याय लिहिला आहे. फार कमी फलंदाजांना जे जमलं ते राहुलने करुन दाखवलं.

IND vs NZ 1st Test : वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्व मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने शानदार शतक झळकवलं आहे. संयम आणि टेक्निक यांचं शानदार उदहारण सादर करत राहुलने ही शतकी कामगिरी केली. भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 368 धावा केल्या आहेत. भारताने काल दिवसअखेर एक बाद 159 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालने वनडे स्टाइल फलंदाजी केली. 85 धावांची खेळी करुन तो बाद झाला. राहुल काल अर्धशतक झळकवून नाबाद होता. आज तिसऱ्या दिवशी त्याने आपलं शतक पूर्ण केलं.
सोबतच त्याने भारतीय क्रिकेट इतिहासात एक सोनेरी अध्याय लिहिला. केएल राहुल काल 52 धावांवर नाबाद होता. त्याने 207 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं. केएल राहुलचं टेस्ट करिअरमधील हे 13 वं शतक आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर किवी संघाविरुद्ध त्याचं हे पहिलं कसोटी शतक आहे. या शतकी खेळीसह राहुलने वर्ल्ड क्रिकेटच्या रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव सोनेरी अक्षरात नोंदवलं आहे.
अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला ओपनर
वेलिंगटनमध्ये शतक पूर्ण करण्यासह केएल राहुलने SENA देशांविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकवण्याचा अनोखा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सेना देश म्हणजे दक्षिण आफ्रीका, इंग्लंड, न्यूजीलंड आणि ऑस्ट्रेलिया. केएल राहुल अशी कामगिरी करणारा भारताचा पहिला ओपनर ठरला आहे. राहुलचा निवडक एशियन दिग्ग्जांच्या लिस्टमध्ये समावेश झाला आहे. ज्यांनी चारही SENA देशांविरुद्ध टेस्ट मध्ये शतकं झळकवली होती.
केएल राहुल फक्त एक शतक लांब
SENA देशांविरुद्ध कठिण परिस्थितीत केएल राहुलचं हे सातवं टेस्ट शतक आहे. या बाबतीत महान भारतीय ओपनर सुनील गावस्कर यांच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यापासून केएल राहुल फक्त एक शतक लांब आहे. सुनील गावस्कर यांच्या नावावर 8 शतकं आहेत.
SENA देशांविरुद्ध शतकं झळकवणारे आशियाई दिग्गज
मोहम्मद अजहरुद्दीन
सचिन तेंडुलकर
सईद अनवर
राहुल द्रविड़
यूनिस खान
कुमार संगकारा
विराट कोहली
केएल राहुल
SENA देशांविरुद्ध सर्वात जास्त शतकं झळकवणारे भारतीय ओपनर
सुनील गावस्कर 8 शतक
केएल राहुल 7 शतक
यशस्वी जैस्वाल 3 शतक
विनू मांकड 3 शतक
वीरेंद्र सेहवाग 3 शतक
रवि शास्त्री 3 शतक