IND vs NZ : मग रोहित शर्माचं फक्त नाव मोठं आहे म्हणून यशस्वी जैस्वालवर अन्याय होतोय असं म्हटलं तर त्यात चूक काय?

IND vs NZ : सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडिया चांगलं प्रदर्शन करतेय. पण याच दौऱ्यातून काही प्रश्न निर्माण झाले आहेत. रोहित शर्मा टेस्ट सीरीजचा भाग नाहीय. पण पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशीच्या एका प्रदर्शनामुळे रोहितच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय.

IND vs NZ : मग रोहित शर्माचं फक्त नाव मोठं आहे म्हणून यशस्वी जैस्वालवर अन्याय होतोय असं म्हटलं तर त्यात चूक काय?
Rohit Sharma-yashasvi jaiswal
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 20, 2026 | 4:49 PM

टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी अनेक प्रश्न होते. पण भारतीय संघाचं प्रदर्शन पाहता सर्वच आघाड्यांवर टीम इंडिया सरस ठरली आहे. न्यूझीलंड मधील खेळपट्ट्या आणि हवामान पाहता भारतीय संघाचं काय होणार? असाच प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला होता. कारण न्यूझीलंड मधल्या खेळपट्ट्या या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असतात. या पीचेसवर भारतीय फलंदाजांनी टी20 मध्ये चमकदार कामगिरी केली. वनडे मध्ये भारतीय फलंदाज अडखळले. पण गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या बॉलर्सपेक्षा दमदार प्रदर्शन केलं. बॉलर्सच्या बळावर टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिका जिंकली. या वनडे सीरीजमुळे एक प्रश्न निर्माण झाला आहे. वेगवान,उसळी घेणाऱ्या विकेट्सवर टीम इंडियाचे फलंदाज तितकी आक्रमक, खुलून फलंदाजी करत नाहीत, जितकी ते भारताच्या विकेट्सवर करतात. सर्वात मुख्य मुद्दा आहे तो रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा.

पहिल्या वनडेचा अपवाद वगळता विराट कोहली फारशी चमक दाखवू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने 51 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाचा विजयाचा मार्ग सुकर झाला. दुसरा ओपनर रोहित शर्माच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. प्रश्नचिन्ह निर्माण होणं सुद्धा स्वाभाविक आहे. कारण पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत रोहितच्या बॅटमधून फक्त 30 धावा निघाल्या. रोहित शर्मा भारताच्या वर्ल्ड कप संघाचा भाग असेल हे जवळपास निश्चित आहे. रोहितने याआधीच्या काही मालिकांमध्ये चांगलं प्रदर्शन केलय. पण खरी परीक्षा न्यूझीलंडच्या विकेट्सवर होती. तिथे तो कमी पडला.

Loading...

रोहित शर्माचं फक्त नाव मोठं

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल या दोघांमध्ये अनुभव, प्रदर्शन याचा विचार करता रोहितला झुकतं माप निवड समितीकडून देण्यात आलं. त्यामुळे यशस्वी जैस्वालमध्ये क्षमता असूनही त्याला वनडे संघात निवडलं नाही. त्याचा समावेश टेस्ट टीम मध्ये केला. रोहित शर्मा आता 38 वर्षांचा आहे, त्याच तुलनेत यशस्वी जैस्वाल खूप तरुण आहे. फिटनेस हा सुद्धा रोहित शर्माच्या बाबतीत एक मुद्दा आहे. वर्ल्ड कपचा विचार करुन रोहित शर्मासाठी यशस्वी जैस्वालला डावललं जात आहे. याच यशस्वीने न्यूझीलंड दौऱ्यात इंडिया ए कडून खेळताना अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये सलग दोन शतकं झळकवली आहेत. आता न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 89 चेंडूत 85 धावा केल्या. यात 16 चौकार मारले. वनडे स्टाइल फलंदाजी केली. मग अशा प्रदर्शनानंतर रोहित शर्माच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का?. रोहित शर्माचं फक्त नाव मोठं आहे म्हणून यशस्वी जैस्वालवर अन्याय होतोय असं म्हटलं तर त्यात चूक काय?.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us