
टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांमध्ये शुबमन गिलचा समावेश होतो. शुबमन वनडे आणि टेस्ट टीमचा कॅप्टन आहे. पण T20 मध्ये मात्र त्याला यश मिळत नाहीय. टी 20 फॉर्मेटमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आटतात. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात हेच दिसून आलं. टी 20 फॉर्मेटमध्ये त्याचा खराब फॉर्म कायम आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्यांची सीरीज खेळणार आहे. काल पहिल्या सामन्यात गिल स्वस्तात आऊट झाला. दुखापतीमधून सावरल्यानंतर गिल या मॅचमध्ये खेळत होता. त्याने फक्त 2 चेंडूंचा सामना केला. लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर तो आऊट झाला. फॅन्सना टी 20 इंटरनॅशनलमध्ये त्याच्या मोठ्या इनिंगची अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.
शुबमन गिल 2 चेंडूत फक्त 4 धावा करुन पॅवेलियनमध्ये परतला. अजून एका अपयशाची नोंद त्याच्या नावावर झाली. ओपनिंगला आलेल्या गिलने पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार मारुन दमदार सुरुवात केलेली. पण पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने सोपा झेल दिला. आकड्यांवरुन गिलची समस्या लक्षात येते. टी 20 इंटरनॅशनलमध्ये शुबमन गिलने शेवटचं अर्धशतक 16 सामन्यांपूर्वी झळकवलं होतं. जुलै 2024 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने अर्धशतकी खेळी केली होती. त्यानंतर तो सतत छोट्या-छोट्या इनिंग खेळतोय.
मागच्या 16 सामन्यातील प्रदर्शन कसं?
याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाच टी 20 सामन्यांच्या सीरीजमध्ये तो एकदाही अर्धशतकी खेळी करु शकला नाही. शुबमन गिलने मागच्या 16 सामन्यात फक्त पाचवेळाच 30 धावांचा आकडा पार केला आहे. भारतात 8 टी 20 सामन्यात चौथ्यांदा तो सिंगल डिजिट म्हणजे एकेरी धावसंख्येवर आऊट झाला.
दोन स्टार खेळाडूंना बाहेर ठेऊन गिलला संधी
शुबमन गिलला टीममध्ये संजू सॅमसनच्या जागी संधी मिळत आहे. याआधी संजू सॅमसन ओपनिंगला यायचा. संजू सॅमसनने ओपनर म्हणून टीम इंडियाकडून टी 20 मध्ये तीन शतकं झळकावली आहेत. मात्र, तरीही त्याच्या बॅटिग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. प्लेइंग 11 बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दुसरीकडे यशस्वी जैस्वाल टी 20 टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याचे टी 20 मधील आकडे खूप शानदार आहेत.