IND vs SA : शुबमन गिलला टी20 संघात ठेवायचं की नाही? क्रीडाप्रेमींचा संताप
टी20 वर्ल्डकप तोंडावर आला असताना टीम इंडियाची बांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे. असं असताना शुबमन गिलला टी20 संघात वारंवार संधी काही खास करताना दिसत नाही. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्या फेल गेला.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिलचा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फॉर्म काही खास नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कारण आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी जवळपास हाच संघ खेळणार आहे. त्यामुळे वारंवार संधी देऊनही शुबमन गिलची बॅट चालत नसल्याने क्रीडाप्रेमींचा धाकधूक वाढली आहे. शुबमन गिलकडे कसोटी आणि वनडे संघाची धुरा आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर त्याच्याकडे या फॉर्मेटची जबाबदारी सोपवली जाईल असं बोललं जात आहे. पण जबाबदारी सोपण्यापूर्वी त्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात शुबमन गिल स्वस्तात बाद झाला. कसोटी सामन्यातील दुखापतीनंतर शुबमन गिल मैदानात परतला आहे. पण फक्त दोन चेंडूंचा सामना करू शकला.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्माला सलामीला उतरले. अभिषेक शर्मा स्ट्राईकला होता. त्याने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली आणि शुबमन गिलला स्ट्राईक दिली. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या. पण पुढच्या चेंडूवर बाद होत तंबूत परतला. लुंगी एनगिडीने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे टी20 क्रिकेटमध्ये पुन्हा त्याच्या पदरी निराशा पडली. शुबमन गिल 2 चेंडूत 4 धावा करून बाद झाला. पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर आखुड टप्प्याच्या चेंडू खेळताना घाई केली आणि झेल देत बाद झाला.
शुबमन गिलच्या फॉर्मबाबत आता प्रश्न विचारले जात आहे. क्रीडाप्रेमींनी शुबमन गिलला संधी आणि संजू सॅमसनला डावललं जात असल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. शुबमन गिलने मागच्या 16 डावांपूर्वी अर्धशतकी खेळी केली होती. झिम्बाब्वे विरुद्ध 2024 मध्ये अर्धशतक ठोकलं होतं. त्यानंतर मोठी खेळी करण्यास अपयशी ठरला आहे. 16 डावात त्याने पाच वेळा 30 चा आकडा पार केला आहे. तर भारतात खेळलेल्या 8 टी20 सामन्यात दुहेरी आकडा गाठू शकला नाही. दुसरीकडे, यशस्वी जयस्वालही चांगल्या फॉर्मात आहे. पण त्याला टी20 संघात संधी मिळत नाही. त्यामुळे निवडकर्त्यांसाठी शुबमन गिलचा फॉर्म आता डोकेदुखी ठरत आहे.
