AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला मिळतोय हा मोठा फायदा, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आरोपाने वातावरण तापलं

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाला मिळणाऱ्या मोठ्या फायद्याबाबत आवाज उठवला जाऊ लागला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियन कर्णधाराने नुकत्याच केलेल्या विधानामुळे वातावरण तापलं आहे. त्याआधी इंग्लंडचे दोन दिग्गज क्रिकेटपटूही याबद्दल बोलले होते. नेमकं काय आहे प्रकरण ?

Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला मिळतोय हा मोठा फायदा, ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या आरोपाने वातावरण तापलं
टीम इंडियाImage Credit source: PTI
| Updated on: Feb 26, 2025 | 9:12 AM
Share

पाकिस्तान हा यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा आयोजक आहे. या स्पर्धेत इतर संघांना त्यांचे सामने खेळण्यासाठी लाहोर, कराची, रावळपिंडी आणि दुबई दरम्यान प्रवास करावा लागला आहे. मात्र टीम इंडियाने पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्याने भारतीय संघाचे सर्व सामने हे एकाच ठिकाणी खेळले जात आहेत. ते ठिकाणयआहे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. मात्र भारतीय संघाला मिळणाऱ्या याच फायद्यामुळे क्रिकेट जगतात अनेकांना मिरच्या झोंबल्या असून त्यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या वक्तव्यानंतर हे प्रकरण अधिकच तापलं आहे. मात्र, कमिन्स दुखापतीमुळे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळत नाहीये. पण तरीही त्याला आपल्या संघाची चिंता आहे, ज्याचा लौकरच भारतीय संघाशी सामना होऊ शकतो.

एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा- कमिन्सचा आरोप

चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान एकाच मैदानावर सर्व सामने खेळणे हा टीम इंडियासाठी मोठा फायदा असल्याचे पॅट कमिन्सने म्हटले आहे. भारतीय संघ आधीच खूप मजबूत आहे. शिवाय त्याच मैदानावर खेळण्याचा फायदाही त्यांना मिळत आहे, असे तो म्हणाला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतीय संघाची कामगिरी

टीम इंडियाबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप स्टेजचे पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने सेमीफायनलचे तिकीट बुक केले आहे. भारतीय संघाने दुबईत बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध सामने खेळले आणि दोन्ही सामने 6-6 गडी राखून जिंकले. आता 2 मार्च रोजी तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया ही दुबईतच न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे.

एकाच मैदानावर खेळण्याचे फायदे काय

इंग्लंडचे दोन माजी कर्णधार माईक अथर्टन आणि नासिर हुसेन म्हणाले की, टीम इंडियाला केवळ एका मैदानावर सामना खेळण्याचा फायदा म्हणजे त्यांना प्रवास करावा लागत नाही. एवढंचट नव्हे तर संघ निवडीतही त्याचा मोठा फायदा होत आहे. त्यामुळे या टूर्नामेंटमध्ये त्यांचा संघ बेस्ट दिसत आहे, असा दावा त्यांनी केला.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडियाला दोष देण्यात येत आहे. हा अस एकमेव संघ आहे ज्याला आपले उपांत्य आणि अंतिम सामने कुठे होणार हे चांगले ठाऊक आहे. इतर संघांच्या बाबतीत असे नाही, असा आरोपही काहींकडून करण्यात येत आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ