ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याची भारतात क्षमता : VVS

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची क्षमता आहे. तसेच भारतीय संघ मजबूत आणि संतुलित असल्याने ऑस्ट्रलियाला धूळ चारू शकतो, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी व्यक्त केला. नागपुरात आयोजित स्पोर्ट्स […]

ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारण्याची भारतात क्षमता : VVS
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. टी-20 मालिकेतील पहिला सामना गमावला असला तरी टीम इंडियामध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची क्षमता आहे. तसेच भारतीय संघ मजबूत आणि संतुलित असल्याने ऑस्ट्रलियाला धूळ चारू शकतो, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी व्यक्त केला.

नागपुरात आयोजित स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन या कार्यक्रमाच्या वार्षिक क्रीडा पुरस्कार सोहळयाप्रसंगी लक्ष्मण बोलत होते.

“आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळात यश संपादन करणं, हे माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासारखं आहे. त्यामुळे सर्वच खेळाडू शिखर गाठतील असं नाही. त्यासाठी कठोर मेहनत आणि सातत्य ठेवल्याशिवाय यश मिळत नाही.” असा मंत्र लक्ष्मण यांनी दिला.

अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, हे सूत्र ज्या खेळाडूच्या लक्षात येतं तोच खेळाडू कधीही अपयशाला घाबरणार नाही. परिस्थिती कशीही असो, देशासाठी खेळणारा प्रत्येक खेळाडू एखाद्या योद्ध्याप्रमाणेच खिलाडू वृत्तीने खेळतो. यश हे एका रात्रीतून मिळणार नाही, त्यासाठी त्याग, मेहनत आणि खेळात सातत्य टिकवणे सर्वात महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारताला पहिल्या टी-20 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. मेलर्बन येथील दुसरा टी-20 सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे भारत मालिकेत 1-0 ने मागे आहे. असं असलं तरी या भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात कमबॅक करत मालिकेत बरोबरी साधेलस, असा विश्वास लक्ष्मणला आहे.

 ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, रिषभ पंत (यष्टिरक्षक), कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ

विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत, पार्थिव पटेल, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार

ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

कसोटी मालिका

पहिला सामना – 6 डिसेंबर

दुसरा सामना – 14 डिसेंबर

तिसरा सामना – 26 डिसेंबर

चौथा सामना – 3 जानेवारी

वन डे मालिका

पहिला सामना – 12 जानेवारी

दुसरा सामना – 15 जानेवारी

तिसरा सामना – 18 जानेवारी

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.