दोन उपकर्णधार घेऊन ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर, स्टार्क आऊट

सिडनी: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशासनाने भारतीय दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियन संघ 24 फेब्रुवारीपासून भारत दौऱ्यावर येत आहे. वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातून वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श या दोघांना वगळण्यात आलं आहे. तर अॅरॉन फिंचकडे कर्णधारपदाची धुरा कायम आहे. टी ट्वेण्टी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल. दुखापतीमुळे …

दोन उपकर्णधार घेऊन ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर, स्टार्क आऊट

सिडनी: ऑस्ट्रेलिया क्रिकेट प्रशासनाने भारतीय दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला. ऑस्ट्रेलियन संघ 24 फेब्रुवारीपासून भारत दौऱ्यावर येत आहे. वन डे आणि टी ट्वेण्टी सामन्यांसाठी निवडण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातून वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आणि मिशेल मार्श या दोघांना वगळण्यात आलं आहे. तर अॅरॉन फिंचकडे कर्णधारपदाची धुरा कायम आहे. टी ट्वेण्टी सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होईल.

दुखापतीमुळे 29 वर्षीय स्टार्क या दौऱ्यातून बाहेर पडला आहे. तर अष्टपैलू मिशेल मार्श संघात स्थान मिळवू शकला नाही. स्टार्कला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दुखापत झाली. त्यामुळे 27 वर्षीय केन रिचर्ड्सनची निवड करण्यात आली आहे. रिचर्ड्सनने 2018-19 बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक 22 विकेट्स घेतल्या होत्या, त्याचाच फायदा त्याला झाला. दुसरीकडे मिशेल मार्शसह पीटर सीडल आणि बिली स्टॅनलेक यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. हे दोघेही ऑस्ट्रेलियात आलेल्या भारताविरुद्धच्या मालिकेसाठी टीममध्ये सहभागी होते.

दरम्यान, पाठीच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या कसोटीत खेळू शकला नाही. त्याऐवजी पॅट कमिन्स आणि अॅलेक्स कॅरी या दोघांना संयुक्तपणे उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. हे दोघेही भारत दौऱ्यात उपकर्णधारपद सांभाळतील.

24 फेब्रुवारीला पहिला तर 27 फेब्रुवारीला दुसरा टी 20 सामना खेळवला जाईल. त्यानंतर 5 सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल.

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ
अरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, अॅलेक्स कॅरी, जेसन बेहरेनडॉर्फ, नॅथन कल्टर नाईल, पीटर हँडस्कॉम्ब, उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, डार्सी शॉर्ट, मार्क्स स्टोइनिस, अॅश्टन टर्नर, अॅडम झांपा.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक

पहिला टी 20: 24 फेब्रुवारी, विशाखापट्टणम

दुसरा टी 20: 27 फेब्रुवारी, बंगळुरु

पहिला वनडे: 2 मार्च, हैदराबाद

दुसरा वनडे: 5 मार्च, नागपूर

तिसरा वनडे: 8 मार्च, रांची

चौथा वनडे: 10 मार्च, मोहाली

पाचवा वनडे: 13 मार्च, दिल्ली

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *