Ind Vs Aus : मेलबर्न कसोटी जिंकायचीय, तर मग भारताने एवढ्या रन्सचं लीड घ्यायलाच हवं!

तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय बॅट्समन काही खास कामगिरी करु शकले नाहीत.

Ind Vs Aus : मेलबर्न कसोटी जिंकायचीय, तर मग भारताने एवढ्या रन्सचं लीड घ्यायलाच हवं!

मेलबर्न :   ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया (Australia vs India 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडिया मजबुत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाअखेर भारताकडे 82 धावांची आघाडी होती. हीच आघाडी वाढवण्याची मोठी संधी भारतीय बॅट्समनकडे होती. परंतु तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात भारतीय बॅट्समन काही खास कामगिरी करु शकले नाहीत. मात्र तरीही भारताकडे आता निर्णायक आघाडी असल्याने तसंच भारतीय बॅट्समन आणखी पिचवर असल्याने ही कसोटी जिंकण्याचं स्वप्न भारतीय संघ तसंच क्रिकेटरसिक पाहत आहेत. (india vs australia 2020 2nd test at mcg)

भारताला मेलबर्न कसोटी जिंकायची असेल तर 200 रन्सचं लीड आवश्यक आहे. त्याचं कारणंही तसंच आहे. एमसीजी क्रिकेट ग्राऊंडवर चौथ्या डावांत सोडा तिसऱ्या डावांतही बॅटिंग करणं तितकं सोपं नसतं. अशा परिस्थितीत भारताने जर 200 धावांचं लीड घेतलं तर ऑस्ट्रेलियाला हे लीड तोडणं कठीण जाईल आणि जर हेच लीड त्यांनी तोडलं नाही तर मग भारत विजयाच्या दिशेने अग्रसेर होऊ शकतो. (india vs australia 2020 2nd test at mcg)

टीम इंडियाचे अंतिम 11 खेळाडू : अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा ( उपकर्णधार), हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाचे अंतिम 11 खेळाडू : टीम पेन (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), जो बर्न्स, मारनस लबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस, मिचेल स्टार्क, नॅथन लॉयन आणि जोश हेझलवूड

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI