AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | पराभवासोबत ऑस्ट्रेलियाला दुहेरी दणका, दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू टी 20 सीरिजबाहेर

टीम इंडियाने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे.

India vs Australia 2020 | पराभवासोबत ऑस्ट्रेलियाला दुहेरी दणका, दुखापतीमुळे 'हा' स्टार खेळाडू टी 20 सीरिजबाहेर
| Updated on: Dec 05, 2020 | 11:58 AM
Share

कॅनबेरा : पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाला या पराभवासह दुहेरी धक्का लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू दुखापतीमुळे या टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियावर ‘करो या मरो’ची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हा खेळाडू मालिकेबाहेर झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एश्टन एगरला (Ashton Agar) दुखापत झाल्याने टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे. India vs Australia 2020 Ashton Agar ruled out of T20 series due to injury

एगरला भारताविरोधातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान उजव्या मांडीला दुखापत झाली होती. एगरऐवजी संघात ऑफ स्पीनर नॅथन लॉयनला (Nathan Lyon)संधी देण्यात आली आहे. तसेच नॅथनला याआधीच टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठीही संधी देण्यात आली आहे.

कर्णधार फिंचच्या खेळण्याबाबत अनिश्चितता

एगर पाठोपाठ कर्णधार अॅरॉन फिंचच्या (Aaron Finch) खेळण्याबाबतही अनिश्चितता कायम आहे. फिंचला पहिल्या टी 20 सामन्यादरम्यान हिप इंज्युरी झाली होती. या दुखापतीबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून पुढील कोणतीही माहितीही देण्यात आलेली नाही.

फिंचच्या काही आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांच्या अहवालानंतरच फिंच खेळणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे. जर ही दुखापत गंभीर असली तर ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. फिंचला जर या टी 20 मालिकेत खेळता आले नाही, तर ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करु शकतो.

दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नरही टी 20 मालिकेबाहेर

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरलाही (David Warner) तिसऱ्या एकदिवसीय आणि टी 20 मालिकेला मुकावं लागलं आहे. टीम इंडियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान वॉर्नरच्या उजव्या मांडीचे स्नायु दुखावले होते. त्यामुळे वॉर्नरला तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला आणि टी 20 मालिकेला मुकावं लागलं.

तसेच पहिल्या एकदिवसीय सामन्यावेळेस मार्कस स्टोयनिस (Marxus Stoinis) यालाही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे मार्कस अजूनपर्यंत मैदानात उतरला नाही.

रवींद्र जडेजाही टी 20 मालिकेला मुकणार

टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू रवींद्र जडेजालाही (Ravindra Jadeja) उर्वरित 2 टी 20 सामन्यांना मालिकेला मुकावं लागलं आहे. जडेजाच्या जागी शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे.

जडेजाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली. तसेच पहिल्या टी 20 सामन्यातील बॅटिंगदरम्यान डोक्याला दुखापत झाली. पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क टाकत होता. स्टार्कने टाकलेला चेंडू बॅटिंग करत असलेल्या जडेजाच्या हेल्मेटवर जाऊन आदळला.

पहिला डाव संपल्यानंतर जडेजावर बीसीसीआयच्या वैदयकीय पथकाने जडेजावर इलाज केलं. मात्र जडेजाला दुसऱ्या डावात फिल्डिंगसाठी येता आले नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली. दरम्यान या टी 20 मालिकेतील दुसरा सामना रविवारी 6 डिसेंबरला सिडनी येथे खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

आधी धोनीकडून टिप्स, नंतर धोनीचाच मोठा विक्रम मोडीत, रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार

India vs Australia 2020 | कांगारुंना दुहेरी झटका, दोन दिग्गज खेळाडू एकदिवसीय आणि टी-20 मालिकेतून बाहेर

India vs Australia 2020 Ashton Agar ruled out of T20 series due to injury

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.