AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार

या खेळाडूच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

India vs Australia 2020 | टीम इंडियाचा मॅच विनर खेळाडू दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेला मुकणार
| Updated on: Dec 05, 2020 | 10:57 AM
Share

कॅनबेरा : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरोधातील (Team India Tour Australia 2020) पहिल्या टी 20 सामन्यात 11 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. मॅन विनर ठरलेल्या रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) या टी 20 मालिकेला मुकावे लागले आहे. बीसीसीआयने याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे. जडेजाला डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे या टी 20 मालिकेला मुकावे लागले आहे. जडेजाऐवजी संघात वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) संधी देण्यात आली आहे. india vs australia 2020 ravindra jadeja ruled out shardul thakur added to squad for t2o series against australia

जडेजाला पहिल्या टी 20 सामन्यातील बॅटिंगदरम्यान डोक्याला दुखापत झाली. पहिल्या डावातील शेवटची ओव्हर मिचेल स्टार्क टाकत होता. स्टार्कने टाकलेला चेंडू बॅटिंग करत असलेल्या जडेजाच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. पहिला डाव संपल्यानंतर जडेजावर बीसीसीआयच्या वैदयकीय पथकाने जडेजावर इलाज केलं. मात्र जडेजाला दुसऱ्या डावात फिल्डिंगसाठी येता आले नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात जडेजाच्या जागी युजवेंद्र चहलला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली.

“जडेजावर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. जडेजाची आज (5 डिसेंबर) एक चाचणी केली जाणार आहे”, अशी माहिती बीसीसीआयने दिली. जडेजाने या पहिल्या टी 20 सामन्यात टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक खेळी केली. जडेजाने 23 चेंडूत 5 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने तडाखेदार नाबाद 44 धावा केल्या.

शार्दूलची शानदार कामगिरी

शार्दूलला जडेजाच्या जागी टी 20 मालिकेत संधी देण्यात आली आहे. शार्दूल निर्णायक वेळी फलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो. तसेच शार्दूलने मागील 2 टी 20 मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. 2020 च्या सुरुवातीला टीम इंडियाने न्यूझीलंडविरोधात 5 टी 20 सामन्यांची मालिका खेळली होती. यामध्ये शार्दूलने एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. या मालिकेत शार्दूलने दर 12 व्या चेंडूपाठी विकेट मिळवली होती. ही मालिका टीम इंडियाने 5-0 अशा फरकाने जिकंली होती. तसेच या मालिकेआधी श्रीलंकेविरोधातही 2 सामन्यांची टी 20 मालिका खेळण्यात आली. यामध्येही शार्दूलने 5 विकेट्स घेतल्या.

दुसरा टी 20 सामना रविवारी

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्याच्यातील दुसरा टी 20 सामना रविवारी 6 डिसेंबरला सिडनीत खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे. तर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना ‘करो या मरो’चा असणार आहे. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलियाला या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अशी आहे टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), शिखर धवन, मयंक अग्रवाल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दीक पांड्या, संजू सैमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर, थंगारासू नटराजन आणि शार्दुल ठाकूर.

संबंधित बातम्या :

आधी धोनीकडून टिप्स, नंतर धोनीचाच मोठा विक्रम मोडीत, रवींद्र जडेजाची शानदार कामगिरी

india vs australia 2020 ravindra jadeja ruled out shardul thakur added to squad for t2o series against australia

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.