IndvsAus LIVE भारताला विजयासाठी 273 धावांची गरज

IndvsAus LIVE भारताला विजयासाठी 273 धावांची गरज

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अंतिम वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 272 धावा केल्या.  भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि मालिकेतील अंतिम वन डे सामना दिल्लीत होत आहे. या सामन्यात 2-2 अशी बरोबरी असल्याने, आजचा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी महत्त्वाचं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

आजच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाचा सलामीवर उस्मान ख्वाजाने झुंजार शतक ठोकलं. ख्वाजाचं हे मालिकेतील दुसरं शतक आहे. ख्वाजा- फिंच जोडीने 76 धावांची दमदार सलामी दिली.  रवींद्र जाडेजाने फिंचला (27) बाद करुन ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला.

यानंतर मग ख्वाजाच्या साथीला पीटर हॅण्डस्कॉम्ब आला. हॅण्डस्कॉम्बनेही या सामन्यात अर्धशतक ठोकलं. या दोघांनी धावांची गती वेळोवेळी वाढवली. अखेर संघाची धावसंख्या 175 झाली असताना, भुवनेश्वरने ख्वाजाला बाद केलं. शतक ठोकून तो लगेचच बाद झाला. त्याने 106 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या सहाय्याने 100 धावा केल्या. उस्मान ख्वाजा आणि पीटर हॅण्डस्कॉम्ब यांची जमलेली जोडी फोडण्यात यश आलं.  या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 99 धावा केल्या.

ख्वाजाचा अडथळा दूर केल्यानंतर धोकादायक ग्लेन मॅक्सवेलही आल्यापावली माघारी गेला. जाडेजाने त्याne अवघ्या 1 धावेवर बाद केलं. त्यानंतर मग हॅण्डस्कॉम्बला शमीने 52 धावांवर बाद केलं. मग ठरावित वेळेत विकेट पडत गेल्याने भाजपला 272 धावांपर्यंतच मजल मारता आली.

दरम्यान, या सामन्यात भारताने यजुवेंद्र चहलऐवजी मोहम्मद शमीला संधी दिली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *