VIDEO | कॅप्टन विराटसोबत पहिल्यांदा खेळण्याचा अनुभव कसा होता, चहलच्या प्रश्नावर इशान काय म्हणाला?

टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यानंतर युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal interviewed) पदार्पणवीर इशान किशनची (debutant ishan kishan) चहल टीव्हीसाठी मुलाखत घेतली.

VIDEO | कॅप्टन विराटसोबत पहिल्यांदा खेळण्याचा अनुभव कसा होता, चहलच्या प्रश्नावर इशान काय म्हणाला?
टीम इंडियाने इंग्लंडवर दुसऱ्या टी 20 सामन्यात शानदार विजय मिळवला. यानंतर युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal interviewed) पदार्पणवीर इशान किशनची (debutant ishan kishan) चहल टीव्हीसाठी मुलाखत घेतली.
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 11:47 AM

अहमदाबाद : भारताने दुसऱ्या टी 20 सामन्यात इंग्लंडचा 7 विकेट्सने (india vs england 2nd t20i) धुव्वा उडवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाकडून कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक नाबाद 73 धावा केल्या. पण आकर्षण ठरला तो पदार्पणवीर (debutant ishan kishan) इशान किशन. इशानने पदार्पणातील सामन्यात 32 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. पदार्पणात अशी कामगिरी करणारा तो अजिंक्य रहाणेनंतर दुसराच भारतीय ठरला. त्याला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान सामन्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलने (yuzvendra chahal) आपल्या चहल टीव्हीसाठी इशानची मुलाखत घेतली. यामध्ये चहलने इशानला अनेक मुद्द्यांवर बोलतं केलं. तसेच इशाननेही दिलखुलासपणे गप्पा मारल्या. (india vs england 2nd t20i yuzvendra chahal interviewed debutant ishan kishan for chahal tv)

कॅप मिळाल्यानंतर तुला कसं वाटलं?

“आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, ही प्रत्येक युवा खेळाडूची अपेक्षा असते. मला ही संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. टीम मॅनेजमेंटने माझ्यावर विश्वास दाखवला. मी टीम सर्कलमध्ये माझ्या भावना व्यक्त केल्या. माझ्या भावना या मनापासून व्यक्त केल्या. मी कॅप मिळाल्यानंतर फार आनंदी होतो. त्यामुळे मी मनापासून बोललो. मला जे वाटलं तसं मी व्यक्त झालो”, असं इशानने नमूद केलं.

बॅटिंगबाबत काय पूर्वतयारी केली होती?

“बॅटिंगआधी मी विराट आणि हार्दिक पांड्यासोबत चर्चा केली. यांनी मला आपल्या बॅटिंगचा आनंद घे. मुक्तपणे खेळ, असा सल्ला दिला. तसेच इशानने युजवेंद्र चहलचाही उल्लेख केला. सेट होण्यासाठी आवश्यक तितका वेळ घे. मुक्तपणे खेळ. आयपीएलमध्ये खेळतोस तसाच खेळ. त्यामुळे चहलने दिलेल्या सल्ल्यानुसारच आपल्याला खेळायचं आहे”, असं इशानने स्पष्ट केलं.

अर्धशतक झाल्याची कल्पना नव्हती?

इशानने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. अर्धशतकानंतर प्रत्येक फलंदाज हा हवेत बॅट उंचावतो. पण इशानने काही सेंकद बॅट उंचावली नाही. याबाबत चहलने इशानला प्रश्न विचारला. यावर इशान म्हणाला की ” माझं अर्धशतक झालंय याबाबत मला कल्पना नव्हती. मी अर्धशतक झाल्यानंतर सहसा बॅट उंचावत नाही. पण विराटने मला खुणावलं. अर्धशतक झाल्याची कल्पना दिली. तुझं पहिलंचं अर्धशतक आहे. मैदानातील चारही बाजूला फिरून बॅट दाखव असं विराट म्हणाला. त्यानंतर मी बॅट उंचावली”, असं इशान म्हणाला. इशानने 28 चेंडूत आपलं पहिलं वहिलं अर्धशतक पूर्ण केलं.

कॅप्टन विराटसोबत खेळण्याचा अनुभव कसा होता?

चहलने या मुलाखतीदरम्यान कॅप्टन विराटसोबत बॅटिंग करण्याचा अनुभव कसा होता, असा प्रश्न इशानला विचारला. यावर इशान म्हणाला की, ” विराट फार उत्सुफर्तपणे खेळतो. त्याच्यात मोठ्या प्रमाणात एनर्जी आहे. त्याच्या या एनर्जी लेव्हलची बरोबरी करणं मला जमत नव्हतं. विराट चौकार मारल्यानंतर तो शारिरक हालचालीतून आपली भूमिका व्यक्त करत असतो. हे मी आधी कधीच अनुभवलं नव्हतं. पण जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतो, तेव्हा आपली देहबोली कशी असावी, हे मला समजलं. विराटच्या प्रत्येक बारीक बारीक हालचालीतून मला खूप काही शिकता आलं “, असं इशान म्हणाला.

संबंधित बातम्या :

PHOTO | शानदार जबरदस्त ! किशनची ‘इशान’दार खेळी, केला सचिन-धोनीसारख्या दिग्गजांना न जमलेला कारनामा

Ishan Kishan | किशनच्या खेळीने ‘गब्बरचं’ टेन्शन वाढलं, संघातील स्थान कायम राखण्यासाठी शिखरसमोर इशानचं आव्हान

VIDEO | पदार्पणातील सामन्यात बॅटिंगने इंग्लंडला घाम फोडणाऱ्या इशानचं विराटकडून तोंडभरून कौतूक, म्हणाला…

(india vs england 2nd t20i yuzvendra chahal interviewed debutant ishan kishan for chahal tv)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.